'गरज असेल तर समोर येऊन थेट माझ्याशी बोला', रोहित-विराट विरुद्ध गंभीरमधील वाद स्फोटाच्या उंबरठ्यावर; दिग्गजांना खुले आव्हान?
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Team India: टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये तणाव चिघळत असून रोहित-विराट आणि कोच गौतम गंभीर यांच्यातील मतभेद आता उघड वादाच्या टप्प्यावर पोहोचल्याची चर्चा आहे. “गरज असेल तर समोर येऊन बोला” या गंभीरांच्या कठोर भूमिकेमुळे संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे सूत्रांचे म्हणणे.
advertisement
1/7

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली वनडे काल 30 नोव्हेंबर रोजी रांची येथे झाली. जवळ जवळ 700 धावसंख्या झालेल्या या चुरशीच्या सामन्यात भारताने आफ्रिकेवर 17 धावांनी विजय मिळवला. मात्र या मॅचनंतर खरी चर्चा टीम इंडियाच्या कामगिरीवर न होती विराट कोहली-रोहित शर्मा यांचे मुख्य कोच गौतम गंभीरशी असलेले संबंध यावर सुरू झाली.
advertisement
2/7
पहिल्या वनडे आधी रोहित आणि विराट यांच्या भवितव्याबद्दल चर्चा सुरू होती. हे दोन्ही खेळाडू 2027चा वनडे वर्ल्डकप खेळतील का? यावर बीसीसीआय काय निर्णय घेणार याबद्दल बराच खल सुरू होता. बीसीसीआय दुसऱ्या वनडे आधी कोच आणि मुख्य निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्यासोबत बैठक करणार असल्याचे समोर आले होते. मात्र त्याआधी थेट टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण बिघडल्याचे वृत्त समोर येत आहे.
advertisement
3/7
भारतीय वनडे संघाच्या ड्रेसिंग रूममधील वातावरण सध्या चांगले नसल्याची माहिती समोर आली आहे. संघामध्ये कोच आणि दोन वरिष्ठ खेळाडू यांच्यातील संवाद तुटल्याची चर्चा असून यामुळे संघातील तणाव वाढल्याचे संकेत मिळत आहेत. अहवालानुसार रोहित शर्मा यांनी स्वतंत्र सराव सत्राची इच्छा व्यक्त केली होती. परंतु गौतम गंभीर यांनी मध्यस्थामार्फत संदेश पाठवून प्रत्यक्ष भेटून बोलण्याची आवश्यकता व्यक्त केली.
advertisement
4/7
याशिवाय विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कोचसोबत नेट सेशन करण्याची विनंती केली होती. मात्र गंभीर यांनी असं होऊ शकत नाही असे स्पष्ट सांगितल्याचे समोर आले आहे. सूत्रांच्या मते दोन्ही दिग्गज खेळाडू कोचशी संवाद साधण्यासाठी पुढे आले होते, परंतु त्यांच्या आणि हेड कोचमधील मतभेद वाढलेले दिसत आहेत.
advertisement
5/7
या संपूर्ण परिस्थितीवर नजर टाकली असता, तणाव वाढल्याच्या चर्चा खऱ्या असल्याचे संकेत मिळतात. कारण 28 नोव्हेंबर रोजी गौतम गंभीर हे रांची येथे एकटेच पोहोचले होते. मात्र 1ल्या वनडे सामन्यापूर्वी झालेल्या सराव सत्रात ते विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासोबत दिसले होते, ज्यामुळे वादाच्या बातम्यांना अधिक जोर मिळाला आहे.
advertisement
6/7
भारतीय क्रिकेटची प्रतिमा खराब होईल अशा या परिस्थितीला अनेक माजी खेळाडू आणि चाहत्यांनी गंभीरतेने घेतले आहे. इतका तणाव संघात का निर्माण झाला आहे, हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता या प्रकरणावर बीसीसीआयने तातडीने हस्तक्षेप करून बैठक घेण्याची गरज असल्याची मागणी वाढत आहे. संघात पुन्हा सुसंवाद आणि समन्वय प्रस्थापित करण्यासाठी बोर्डाने भूमिका घेतली नाही तर आगामी मालिकांवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
advertisement
7/7
दरम्यान आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे विराट कोहलीने शतकी खेळी केली. त्याचे हे वनडेमधील विक्रमी 52वे शतक ठरले. तर दुसऱ्या बाजूला रोहित शर्माने वनडेतील 60वे अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागिदारी करून संघाच्या मोठ्या धावसंख्येत महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. आता बीसीसीआय या तिघांमधील तणाव कसा कमी करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
'गरज असेल तर समोर येऊन थेट माझ्याशी बोला', रोहित-विराट विरुद्ध गंभीरमधील वाद स्फोटाच्या उंबरठ्यावर; दिग्गजांना खुले आव्हान?