'मला फ्रीच्या गोष्टी...' धनुषनंतर श्रेयस अय्यरच्या प्रेमात पडली मृणाल ठाकूर? आईसोबतचा VIDEO शेअर करत म्हणाली...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Mrunal Thakur Dating Shreyas Iyer: सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे, ज्यात मृणाल ठाकूर भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला जात आहे!
advertisement
1/7

मुंबई: बॉलिवूडमध्ये सध्या चर्चा आहे ती अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या डेटिंगच्या अफवांची. काही दिवसांपूर्वी तिचं नाव अभिनेता धनुषसोबत जोडलं गेलं होतं. मात्र, आता सोशल मीडियावर एक वेगळीच पोस्ट व्हायरल झाली आहे, ज्यात ती भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला जात आहे.
advertisement
2/7
रेडिटवर एका पोस्टमध्ये मृणाल आणि श्रेयस अय्यर एकमेकांना गुपचूप भेटत असल्याचं म्हटलं आहे. ही पोस्ट वाऱ्यासारखी पसरताच, मृणाल ठाकूरने दुसऱ्याच दिवशी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे, पण तिची प्रतिक्रिया फारच हटकी आणि मजेदार आहे.
advertisement
3/7
रविवार रात्री मृणाल ठाकूरने इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामुळे तिच्या डेटिंगच्या चर्चांना नवं वळण मिळालं. मृणालने या अफवांबद्दल थेट बोलणे टाळले असले तरी, तिने आईकडून चंपी घेतानाचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ती जोरजोरात हसत असल्याचे दिसत आहे.
advertisement
4/7
या व्हिडिओला तिने एक मजेदार कॅप्शन दिले, जे थेट अफवा पसरवणाऱ्यांना टोला देणारे होते. तिने लिहिले, "ते बोलतात, आम्ही हसतो. P.S. अफवा म्हणजे माझ्यासाठी 'फ्री पीआर' आहे आणि मला फुकटच्या गोष्टी खूप आवडतात!"
advertisement
5/7
मृणालच्या या 'फ्री पीआर'च्या कॅप्शनवरून तिने श्रेयस अय्यरसोबतच्या डेटिंगच्या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे हसून स्पष्ट केले आहे.
advertisement
6/7
रेडिटवरील व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात आला होता की, मृणाल आणि श्रेयस अय्यर गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना लपूनछपून भेटत आहेत आणि त्यांचे नाते अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहे. अनावश्यक मीडिया टाळण्यासाठी त्यांनी हे नाते गुप्त ठेवले आहे. मात्र, मृणालच्या पोस्टवरून हे स्पष्ट होते की, या अफवांमध्ये काहीही तथ्य नाही.
advertisement
7/7
कामाबद्दल बोलायचं झाल्यास, मृणाल ठाकूर नुकतंच अजय देवगण सोबत 'सन ऑफ सरदार २' मध्ये दिसली होती. यानंतर ती डेव्हिड धवन दिग्दर्शित 'है जवानी तो इश्क होना है' मध्ये वरुण धवन, पूजा हेगडे, मौनी रॉय यांच्यासह दिसणार आहे. याशिवाय, ती सिद्धार्थ चतुर्वेदी सोबत 'दो दिवाने सेहर में' या रोमँटिक ड्रामामध्येही मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट २० फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मला फ्रीच्या गोष्टी...' धनुषनंतर श्रेयस अय्यरच्या प्रेमात पडली मृणाल ठाकूर? आईसोबतचा VIDEO शेअर करत म्हणाली...