TRENDING:

Camping Tips : थंडीत डोंगरावर कॅम्पिंगसाठी जाताय? 'या' गोष्टी सोबत ठेवा, अन्यथा खराब होईल ट्रीपची मजा

Last Updated:
What to pack for mountain camping : धावपळीच्या जीवनातून विश्रांती घेण्यासाठी आपण सुट्ट्यांचे नियोजन करतो आणि त्या अधिक आरामदायी बनवण्याचा प्रयत्न करतो. शहराच्या आवाज आणि प्रदूषणापासून दूर राहण्यासाठी बरेच लोक पर्वतांवर कॅम्पिंग करणे पसंत करतात. तुम्हीही सुट्टीसाठी पर्वतांवर जाण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहोत, ज्या तुमच्याकडे असाव्याच, जेणेकरून प्रवास सुरक्षित करतील.
advertisement
1/7
डोंगरावर कॅम्पिंगला जाताय? या गोष्टी सोबत ठेवा, अन्यथा खराब होईल ट्रीपची मजा
योग्य तंबू : डोंगरांमध्ये कॅम्पिंग करताना तुम्हाला प्रथम एक मजबूत तंबू आवश्यक आहे. यासाठी एखाद्या प्रतिष्ठित दुकानातून किंवा मॉलमधून एक मजबूत तंबू खरेदी करा. खरं तर पर्वतांमध्ये वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी चांगली पकड असलेला तंबू महत्त्वाचा असतो.
advertisement
2/7
जाड मॅट : तंबू उभारल्यानंतर जमिनीवर जाड मॅट टाकावी लागेल. त्यानंतर तुमची गाडी किंवा इतर गोष्टी टाकता येतील. या मॅटमुळे तुमचा बेड कोरडा राहील आणि तुम्हाला थंडी देखील कमी वाटेल.
advertisement
3/7
स्लीपिंग बॅग : कॅम्पिंग करताना स्लीपिंग बॅगही वापरावी. कारण यामुळे तुम्ही थंडीपासून वाचू शकता. त्यांचा विशेष फायदा म्हणजे ते हलके असतात. खूप थंडी असल्यास तुम्ही त्यात स्वतःला सहजपणे पॅक करू शकता.
advertisement
4/7
अन्न आणि पेय : क्लूठेही फिरायला जाताना आपल्या कडे आपले स्वतःचे अन्न आणि पेय असावेच. डोंगरावर कॅम्पिंगला जातानाही हे लक्षात ठेवा. कारण यामुळे तुम्हाला वेळेवर ते शोधत फिरावे लागणार नाही. शिवाय, आजकाल लहान स्टोव्ह आणि बऱ्याच अशा छोट्या वस्तू मिळतात, ज्याद्वारे आपण डोंगरातही फ्रेश जेवण तयार करू शकू.
advertisement
5/7
उबदार कपडे : जर तुम्ही बर्फाळ डोंगरावर कॅम्पिंग करत असाल तर उबदार कपडे घालून तंबूत झोपा. साध्या तर हिवाळा आहे आणि हल्ली मुंबईसारख्या शहरातही खूप थंडी पडत आहे. त्यामुळे फिरायला जाताना उबदार कपडे सोबत ठेवणं कधीच श्रेयस्कर. हे तुम्हाला थंडीपासून वाचवेल आणि चांगली झोप देईल.
advertisement
6/7
काड्या गोळा करा : तुमच्या कॅम्पिंगच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी झाडांच्या काही छोट्या छोट्या काड्या किंवा लाकडं गोळा करा. कारण संध्याकाळी खूप थंडी पडली तर तुम्ही शेकोटीचा आनंद घेऊ शकता. यामुळे तुमचा कॅम्प देखील उबदार राहील. झोपण्यापूर्वी मात्र आग विझवण्याचे लक्षात ठेवा. हे खूप महत्त्वाचं आहे.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Camping Tips : थंडीत डोंगरावर कॅम्पिंगसाठी जाताय? 'या' गोष्टी सोबत ठेवा, अन्यथा खराब होईल ट्रीपची मजा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल