TRENDING:

Licorice : ज्येष्ठमध खाण्याचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या ज्येष्ठमधाचा वापर कसा करायचा ?

Last Updated:

ज्येष्ठमध ही एक प्रसिद्ध आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, घसा आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांमधे ज्येष्ठमध खूप फायदेशीर मानला जातो. ज्येष्ठमध योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनं वापरलं तर शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : खोकला, खवखव अशी घशाची कोणती समस्या जाणवली की, ज्येष्ठमध आणि मध किंवा ज्येष्ठमधाची पावडर असे उपाय केले जातात. ज्येष्ठमधाला मुलेठी असंही म्हटलं जातं.
News18
News18
advertisement

ज्येष्ठमध ही एक प्रसिद्ध आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, घसा आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांमधे ज्येष्ठमध खूप फायदेशीर मानला जातो. ज्येष्ठमध योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनं वापरलं तर शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो.

यासाठी अर्धा चमचा ज्येष्ठमध पावडर, एक कप सुमारे दोनशे मिलीलीटर पाणी, तुळशीची तीन-चार पानं, अर्धा लिंबू आणि अर्धा चमचा मध लागेल. एका भांड्यात एक कप पाणी उकळवा. अर्धा चमचा ज्येष्ठमध पावडर किंवा एक इंचाचा ज्येष्ठमधाचा तुकडा घाला. पाण्यात तुळशीची पानं घाला. मंद आचेवर पाच-सात मिनिटं उकळू द्या. पाणी थोडं कमी झाल्यावर ते गाळून घ्या आणि कोमट झाल्यावर प्या. चवीनुसार मध किंवा लिंबू घालू शकता. दिवसातून एकदा, सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर हे पाणी प्या.

advertisement

Skin Care: घरी तयार करा कोरियन ग्लास क्रिम, जाणून घ्या क्रिम बनवण्याची पद्धत

खोकला, सर्दी किंवा घसा खवखवत असेल तर हे पाणी दिवसातून दोनदा पिऊ शकता. पण सतत तीन-चार आठवड्यांपेक्षा जास्त काळ घेऊ नका आणि मधे मधे ब्रेक घ्या. याशिवाय, दुधासोबत पिण्याऐवजी पाण्यात उकळून पिणं चांगलं मानलं जातं.

घसा खवखवणं आणि खोकल्यापासून यामुळे आराम मिळतो. या पाण्यामुळे सर्दी, ब्राँकायटिस आणि दम्यापासून आराम मिळतो.

advertisement

पचनसंस्थेला आराम - आम्लपित्त आणि वायूपासून मुक्त होण्यासाठी यामुळे मदत होऊ शकते. यामुळे पोटातली जळजळ कमी होते आणि पचन सुधारतं.

रोगप्रतिकारक शक्ती - या पाण्यात दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असतात, यामुळे शरीराला रोगांशी लढण्यास मदत होते. हे पाणी नियमितपणे प्यायल्यानं संसर्ग टाळता येतो.

Cycling: सर्व वयोगटांसाठी उत्तम व्यायाम, वाचा सायकलिंगचे आरोग्यदायी फायदे

advertisement

त्वचेसाठी उपयुक्त - ज्येष्ठमधामुळे त्वचेवरचे डाग कमी होतात आणि त्वचेची चमक वाढवण्यास मदत होऊ शकते. म्हणूनच अनेक त्वचा काळजी उत्पादनांमध्ये ज्येष्ठमधाचा अर्क वापरला जातो.

ताण आणि थकवा दूर करणं - ज्येष्ठमधामुळे ताण, चिंता आणि थकवा कमी करण्यास मदत होऊ शकते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

तोंडातील अल्सर आणि दातदुखीसाठी फायदेशीर - या सर्वांव्यतिरिक्त, ज्येष्ठमधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतो, यामुळे तोंडातील अल्सर, दुर्गंधी आणि सुजलेल्या हिरड्यांसारख्या समस्यांवर उपचार करण्यासाठी ज्येष्ठमध उपयुक्त मानला जातो.

advertisement

गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच हे पाणी प्यावं.

उच्च रक्तदाब, मूत्रपिंड किंवा हृदयरोग असलेल्यांनी हे पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

खारट पदार्थांसोबत ज्येष्ठमधाचं पाणी पिणं टाळा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी पडतेय? शरिराला लावा तिळाचे कोमट तेल, होतील हे फायदे
सर्व पहा

शिवाय, हे पाणी जास्त काळ जास्त प्रमाणात पिणंही टाळा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Licorice : ज्येष्ठमध खाण्याचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या ज्येष्ठमधाचा वापर कसा करायचा ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल