Healthy Living : स्मरणशक्ती चांगली होते समजून खाऊ नका बदाम, आधी याचे 'हे' 5 फायदे आणि खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
- Published by:Devika Shinde
Last Updated:
बदाम हे व्हिटॅमिन ई, प्रथिने (Protein), कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि निरोगी चरबीने (Healthy Fats) समृद्ध असतात. पण, बदामाचे खरे फायदे तेव्हाच मिळतात, जेव्हा ते योग्य पद्धतीने खाल्ले जातात.
advertisement
1/9

आपल्या शरीराला बळकट ठेवण्यासाठी आणि कार्यक्षम राखण्यासाठी योग्य आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी तज्ज्ञ हिरव्या भाज्या, फळं, अंड. मांस खाण्याचा सल्ला देतात. आपली भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदात अनेक पदार्थांना 'सुपरफूड' (Superfood) चा दर्जा देण्यात आला आहे, त्यापैकीच एक आहे बदाम (Almonds). हिवाळ्यात विशेषतः बदाम खाण्यावर भर दिला जातो.
advertisement
2/9
बदाम हे व्हिटॅमिन ई, प्रथिने (Protein), कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि निरोगी चरबीने (Healthy Fats) समृद्ध असतात. पण, बदामाचे खरे फायदे तेव्हाच मिळतात, जेव्हा ते योग्य पद्धतीने खाल्ले जातात. तज्ज्ञांच्या मते, बदाम कच्चे खाण्याऐवजी ते भिजवून खाल्ल्यास त्यांचे आरोग्यदायी फायदे अनेक पटींनी वाढतात. त्यामुळे बहुतांश लोक बदाम रात्र भर पाण्यात भिजवून खातात. पण असं का खाल्लं जातं? त्याची योग्य पद्धत काय आहे माहितीय? चला जाणून घेऊ.
advertisement
3/9
बदामाच्या पृष्ठभागावर काही एन्झाईम-अवरोधक (Enzyme-Inhibiting) पदार्थ असतात. बदाम भिजवल्याने हे पदार्थ निघून जातात. त्यामुळे ते पचायला सोपे जाते आणि शरीर बदामातील पोषण तत्वे आणि ऊर्जा अधिक जलद गतीने शोषून घेऊ शकते.
advertisement
4/9
भिजवलेले बदाम खाण्याचे 5 जबरदस्त फायदेआयुष चिकित्सक डॉ. आकांक्षा दीक्षित यांच्या मते, भिजवलेले बदाम खाणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरते1. मेंदूची कार्यक्षमता वाढते (Brain Health)बदाम हे 'ब्रेन फूड' म्हणून ओळखले जातात. यात ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. हे घटक मेंदूला ऊर्जा देतात आणि स्मरणशक्ती (Memory) वाढवतात. विद्यार्थी, सतत मानसिक काम करणारे कर्मचारी आणि बौद्धिक काम करणाऱ्या लोकांसाठी हे अत्यंत फायदेशीर आहे. बदामातील पोषण तत्वे मेंदूला 'अँटी-एजिंग' (Anti-Aging) गुणधर्म प्रदान करतात, ज्यामुळे ताण कमी होतो.
advertisement
5/9
2. त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त (Skin and Hair)भिजवलेले बदाम त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप प्रभावी ठरतात. त्यांच्या सेवनाने त्वचेमध्ये चमक येते आणि चेहऱ्यावरील कोरडेपणा (Dryness) कमी होतो. ते अकाली सुरकुत्या (Wrinkles) येण्यापासून रोखतात. केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळण्याची समस्या कमी होते.
advertisement
6/9
3. मधुमेह आणि हृदयाचे आरोग्य (Diabetes and Heart)मधुमेह आणि हृदयविकारांनी त्रस्त लोकांसाठी भिजवलेले बदाम खूप उपयुक्त आहेत. ते रक्तातील शर्करा (Blood Sugar) पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. ते 'खराब कोलेस्टेरॉल' (LDL) कमी करतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात.
advertisement
7/9
4. वजन नियंत्रणात मदत (Weight Loss)वजन कमी (Weight Loss) करू इच्छिणाऱ्यांसाठी बदाम हा एक उत्तम पर्याय आहे. बदाम पोट दीर्घकाळ भरलेले ठेवतात, ज्यामुळे अनावश्यक आणि अस्वस्थ स्नॅक्स खाण्याची इच्छा कमी होते.
advertisement
8/9
5. पचन सुधारते आणि ऊर्जा मिळते (Digestion and Energy)बदामामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता (Constipation) आणि इतर पचनाच्या समस्या दूर होतात. याव्यतिरिक्त, ते शरीरातील रक्त परिसंचरण (Blood Circulation) सुधारून थकवा दूर करतात, ज्यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, निरोगी जीवनशैलीसाठी दररोज सकाळी मूठभर भिजवलेले बदाम खाणे फायदेशीर आहे.
advertisement
9/9
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी त्याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Healthy Living : स्मरणशक्ती चांगली होते समजून खाऊ नका बदाम, आधी याचे 'हे' 5 फायदे आणि खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या