हा काल्पनिक चित्रपट नाही!
मेजर मोहित शर्मा यांच्या पालकांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, त्यांच्या मुलाच्या परवानगीशिवाय त्याच्या जीवनकथेवर आधारित चित्रपट बनवला जात आहे. पालकांच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला की, "हा केवळ 'अस्पष्ट साधर्म्य' चे प्रकरण नाही, तर चित्रपट थेट मेजर शर्मा यांच्या शौर्यावर आधारित आहे." निर्माते चित्रपट काल्पनिक असल्याचे सांगत असले तरी, प्रेक्षक आणि मीडियातील लोक रणवीस सिंग साकारत असलेले पात्र हे मेजर मोहित शर्माच असल्याचे मानत आहेत.
advertisement
याचिकेत म्हटले आहे की, चित्रपटाचा ट्रेलर, पात्रांची रचना आणि लष्करी पार्श्वभूमी पाहता, ही कथा मेजर शर्मा यांच्याच वास्तविक जीवनातील ऑपरेशन्स आणि बलिदानाचे अचूक चित्रण करते.
निर्मात्यांचा युक्तिवाद
चित्रपटाचे निर्माते, ज्येष्ठ वकील सौरभ कृपाल यांच्यामार्फत कोर्टात हजर झाले. त्यांनी हा चित्रपट काल्पनिक असल्याचा दावा केला. "मेजर शर्मा जम्मूमध्ये हुतात्मा झाले, तर हा चित्रपट पाकिस्तानमध्ये असलेल्या भारतीय विशेष दलाच्या अधिकाऱ्याबद्दल आहे. त्यामुळे ठिकाण वेगळे आहे," असे त्यांनी सांगितले. CBFC चे वकील आशिष दीक्षित यांनी कोर्टाला सांगितले की, चित्रपटाचे प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे आणि चित्रपट काल्पनिक कथेवर आधारित आहे.
कोर्टाचा CBFC ला महत्त्वाचा निर्देश
पालकांनी चित्रपट सार्वजनिक प्रदर्शनापूर्वी कुटुंबासाठी खासगी स्क्रीनिंग ठेवण्याची विनंती केली होती. न्यायालयाने चित्रपटाच्या प्रमाणीकरणाचा मुद्दा CBFC कडे असल्याने, याचिका निकाली काढली. कोर्टाने CBFC ला निर्देश दिले आहेत की, मेजर शर्मा यांच्या कुटुंबाने याचिकेत उपस्थित केलेल्या सर्व चिंता आणि मुद्द्यांचा सखोल विचार करावा. तसेच, ही बाब इंडियन आर्मीच्या तज्ज्ञ समितीकडे पाठवायची की नाही, याचाही विचार करण्याचे निर्देश दिले आहेत.
कुटुंबाने कोर्टाकडे अशीही मागणी केली आहे की, कोणत्याही हुतात्मा लष्करी जवानाचे चित्रण करणारा चित्रपट त्यांच्या कायदेशीर वारसांच्या आणि भारतीय लष्कराच्या मान्यतेशिवाय प्रदर्शित होऊ नये, अशी घोषणा करावी.
