TRENDING:

VPN वापरत असाल तर व्हा सावधान! होऊ शकतो मोठा फ्रॉड, गुगलने दिला इशारा 

Last Updated:

तुम्ही VPN वापरत असाल तर, Google ने एक वार्निंग जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की, अनेक बनावट VPN अ‍ॅप्स यूझर्सच्या डिव्हाइसवर मालवेअर इन्स्टॉल करत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : तुम्ही VPN वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. टेक जायंट गुगलने अलीकडेच VPN यूझर्ससाठी एक इशारा जारी केला आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, सायबर गुन्हेगार बनावट VPN अ‍ॅप्स वापरणाऱ्या लोकांना लक्ष्य करत आहेत. हे अ‍ॅप्स अनेकदा विश्वासार्ह कंपन्यांनी विकसित केल्याचा दावा करतात आणि गोपनीयतेच्या उद्देशाने वापरले जातात. एकदा इन्स्टॉल केल्यानंतर, हे अ‍ॅप्स यूझर्सच्या डिव्हाइसवर मालवेअर आणि रिमोट अ‍ॅक्सेस टूल्स इन्स्टॉल करू शकतात. ज्यामुळे ते मेसेज, ब्राउझिंग हिस्ट्री आणि फायनेंशियल क्रेडेन्शियल्स चोरू शकतात.
व्हीपीएन यूझर्स
व्हीपीएन यूझर्स
advertisement

Google ने हा सल्ला दिला आहे

Google ने यूझर्सना अशा अ‍ॅप्सपासून कसे दूर राहायचे याबद्दल टिप्स देखील दिल्या आहेत. Google ने यूझर्सना Google Play Protect नेहमी चालू ठेवण्याचा सल्ला दिला आहे. हे फीचर हानिकारक अ‍ॅप्स शोधण्यासाठी मशीन लर्निंगचा वापर करते आणि फसवणूक संरक्षण प्रणाली वाढवते. आर्थिक फसवणुकीसाठी आवश्यक असलेल्या परमिशन ब्लॉक करते. शिवाय, एखादा यूझर ब्राउझर किंवा फाइल मॅनेजरमधून साइडलोडिंग करण्याचा प्रयत्न करत असेल तर Play Protect त्या इंस्टॉलेशनला प्रतिबंधित करू शकते.

advertisement

Flipkart च्या Buy Buy सेलची घोषणा! बंपर डिस्काउंटसह मिळतील 'हे' प्रोडक्ट्स

सुरक्षित राहण्यासाठी यूझर्सने काय करावे?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी पडतेय? शरिराला लावा तिळाचे कोमट तेल, होतील हे फायदे
सर्व पहा

अशा बनावट अ‍ॅप्सपासून सावध राहण्यासाठी, नेहमी Play Store किंवा App Store वरून अ‍ॅप्स डाउनलोड करा. अज्ञात किंवा संशयास्पद सोर्सवरील लिंकवर क्लिक करून अ‍ॅप्स डाउनलोड करू नका. एखाद्या अ‍ॅपने तुम्हाला प्ले प्रोटेक्ट बंद करण्यास सांगितले तर ते इन्स्टॉल करू नका. तसेच, चिनी डेव्हलपर्सनी विकसित केलेले व्हीपीएन अ‍ॅप्स डाउनलोड करणे टाळा. गुगल तसेच अमेरिकेच्या सायबरसुरक्षा आणि पायाभूत सुविधा सुरक्षा एजन्सीनेही व्हीपीएन अ‍ॅप्सबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
VPN वापरत असाल तर व्हा सावधान! होऊ शकतो मोठा फ्रॉड, गुगलने दिला इशारा 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल