शाहरुखचे जगभर कोट्यवधी चाहते; पण SRK इंस्टावर करतो फक्त या पाच स्त्रियांना फॉलो
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान इंस्टाग्रामवर फक्त पाच महिलांना फॉलो करतो. या प्रत्येक महिलेसोबत किंग खानचं स्पेशल कनेक्शन आहे.
advertisement
1/7

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. देशातील सर्वात महागडा असणाऱ्या या अभिनेत्याचं स्टारडम कोणापासून लपलेलं नाही. सोशल मीडियावरदेखील शाहरुख तेवढाच सक्रीय आहे.
advertisement
2/7
शाहरुख खानचे इंस्टाग्रामवर 47.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. पण शाहरुख मात्र आर्यन खान व्यतिरिक्त फक्त पाच महिलांनाच फॉलो करतो.
advertisement
3/7
गौरी खान : शाहरुख खान आपली पत्नी गौरी खानला इंस्टावर फॉलो करतो. आपल्या आजवर करिअरमध्ये शाहरुखने अनेक अभिनेत्रींसोबत रोमान्स केला आहे. पण वैयक्तिक आयुष्यात मात्र तो कायम गौरी खानसोबतच एकनिष्ठ आहे. सिनेसृष्टीत पदार्पण करण्याआधीच शाहरुख गौरी खानसोबत लग्नबंधनात अडकला होता. आज त्यांच्या सुखी संसाराला 30 वर्षे झाली आहेत.
advertisement
4/7
सुहाना खान : शाहरुख एक उत्कृष्ट वडील आहे. आपल्या तीन मुलांवर तो खूप प्रेम करतो. लेक सुहानासोबत शाहरुखचं मैत्रीचं नातं आहे. आपल्या लाडक्या लेकीला तो इंस्टाग्रामवर फॉलो करतो. तसेच लेकीच्या प्रत्येक पोस्टवर शाहरुखचं लक्ष असतं. अनेकदा तो मजेदार कमेंटदेखील करतो. सुहाना लवकरच शाहरुखसोबत त्याच्या आगामी 'किंग' या चित्रपटात झळकणार आहे.
advertisement
5/7
आलिया चिब्बा : शाहरुखसाठी त्याचं कुटुंब सर्वकाही आहे. शाहरुख आलिया चिब्बालाही फॉलो करतो. आलिया दिल्लीत राहत असून ती गौरी खानची भाची आहे. आपल्या कुटुंबातील आलिया चिब्बालाही किंग खान फॉलो करतो.
advertisement
6/7
पूजा ददलानी : शाहरुखच्या फॉलो लिस्टमध्ये त्याची मॅनेजर पूजा ददलानीचाही समावेश आहे. शाहरुख आणि पूजा ददलानी अनेकदा एकत्र स्पॉट होतात. पूजा शाहरुखची मॅनेजर असून गौरी खानची खास मैत्रिणदेखील आहे. पूजा 2012 पासून शाहरुखसोबत काम करत आहे.
advertisement
7/7
काजल आनंद : शाहरुख खान काजल आनंदलाही फॉलो करतो. अनेक सेलिब्रिटी पार्ट्या होस्ट करणारी काजल आनंद शाहरुख आणि गौरीची चांगली मैत्रिण आहे. काजल ही वकील असून अनेक ब्रँड्सची मालकिनदेखील आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
शाहरुखचे जगभर कोट्यवधी चाहते; पण SRK इंस्टावर करतो फक्त या पाच स्त्रियांना फॉलो