TRENDING:

Snake Fact : थंडी पडली की साप अचानक कुठे गायब होतात? समोर आलं धक्कादायक रहस्य

Last Updated:
सापाच्या दंशात विष असल्यामुळे माणूस मरु शकतो. त्यामुळे लोक सापाला घाबरतात. ज्यामुळे साप लांबून जरी दिसला तरी लोक तिथून पळ काढतात. पण असं असलं तरी लोकांना सापाबद्दल जाणून घ्यायला फार आवडतं.
advertisement
1/8
Snake Fact : थंडी पडली की साप अचानक कुठे गायब होतात? समोर आलं धक्कादायक रहस्य
साप हा सरपटणारा आणि सहज दिसणारा प्राणी आहे. सापामुळे माणसाला तसा थेट धोका नाही. कारण त्याचं मेन टार्गेट माणूस नाही. पण कधीकधी भीतीमुळे किंवा स्वत:ला वाचवण्यासाठी साप दंश करतो. सापाच्या दंशात विष असल्यामुळे माणूस मरु शकतो. त्यामुळे लोक सापाला घाबरतात. ज्यामुळे साप लांबून जरी दिसला तरी लोक तिथून पळ काढतात. पण असं असलं तरी लोकांना सापाबद्दल जाणून घ्यायला फार आवडतं.
advertisement
2/8
उन्हाळा आणि पावसाळ्यात ते सहज दिसतात, पण हिवाळा सुरू झाला की अचानक ते कुठेच दिसेनासे होतात. मग प्रश्न पडतो. साप जातात कुठे? मरतात का? की कुठल्या गूढ जगात लपून बसतात?
advertisement
3/8
याचं उत्तर विज्ञानात लपलेलं आहे.साप हे थंड रक्ताचे प्राणी (Cold-blooded animals) असतात. म्हणजेच त्यांचं शरीराचं तापमान बाहेरील हवामानावर अवलंबून असतं. थंडी पडली की त्यांच्या शरीरातील उष्णता कमी होते, हालचाली मंदावतात आणि ऊर्जा वाचवण्यासाठी ते शीतनिद्रा (Hibernation) या अवस्थेत जातात.
advertisement
4/8
साप थंडीमध्ये कुठे लपतात?हिवाळ्याच्या काळात साप सुरक्षित आणि उबदार ठिकाण शोधतात. जसे की जमिनीतले बिळ, दगडांच्या फटी, झाडांच्या मुळाखालील पोकळी किंवा शांत गुहा. काही वेळा तर अनेक साप एकाच बिळात एकत्र झोपलेलेही आढळतात, कारण त्यामुळे शरीरातील उष्णता टिकवून ठेवता येते.
advertisement
5/8
साप खरंच झोपतात का?बर्‍याच लोकांना वाटतं, साप झोपत नाही कारण त्यांचे डोळे नेहमी उघडेच असतात. प्रत्यक्षात, सापांना पापण्या नसतात, त्यांच्या डोळ्यांवर पारदर्शक पातळ पडदा असते जी धूळीपासून संरक्षण करते. त्यामुळे झोपेतही त्यांचे डोळे उघडे दिसतात.
advertisement
6/8
वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार सापांनाही झोपेचे चक्र असते. झोपेत त्यांचा श्वास मंदावतो, शरीर पूर्ण शांत होते आणि बाहेरील आवाज किंवा प्रकाशावर प्रतिक्रिया देणे कमी होतं.
advertisement
7/8
साप किती वेळ झोपतात?सामान्य परिस्थितीत साप 12 ते 16 तास झोपतात, पण थंडीच्या हंगामात ही झोप काही महिन्यांपर्यंत टिकते. काही वाळवंटी प्रजातींमध्ये याउलट होते. त्या उन्हाळ्यात झोपेच्या अवस्थेत जातात, ज्याला एस्टिवेशन (Estivation) म्हणतात.
advertisement
8/8
जगभरातील सापजगात सुमारे 3,000 पेक्षा जास्त सापांच्या प्रजाती आहेत, त्यापैकी भारतात जवळपास 69 विषारी प्रजाती आढळतात. 40 जमिनीवर तर 29 समुद्रात. किंग कोब्रा, करैत, वायपर, ब्लॅक माम्बा हे जगातील काही सर्वात घातक साप मानले जातात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Snake Fact : थंडी पडली की साप अचानक कुठे गायब होतात? समोर आलं धक्कादायक रहस्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल