TRENDING:

Katrina Kaif Baby Boy : आई ख्रिश्चन, वडील मुस्लिम... मग कतरिना कैफ कोणता धर्म मानते? सर्वांसमोर करते 'ती' गोष्ट

Last Updated:
Katrina Kaif Religion : कतरिनाच्या धार्मिक श्रद्धांबद्दल चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. तिचे आई-वडील वेगवेगळ्या धर्मांचे असल्यामुळे ती नेमका कोणता धर्म मानते, हा प्रश्न अनेकदा विचारला जातो.
advertisement
1/7
आई ख्रिश्चन, वडील मुस्लिम... मग कतरिना कैफ कोणता धर्म मानते?
मुंबई: बॉलिवूडचं क्यूट कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या घरी नुकताच एका गोंडस बाळाचे आगमन झाले आहे. विकी कौशलने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच, या दोघांवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
advertisement
2/7
कतरिना तिच्या अभिनय आणि सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते, पण तिच्या धार्मिक श्रद्धांबद्दल चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. तिचे आई-वडील वेगवेगळ्या धर्मांचे असल्यामुळे ती नेमका कोणता धर्म मानते, हा प्रश्न अनेकदा विचारला जातो.
advertisement
3/7
कतरिना कैफचा जन्म एका ब्रिटिश कुटुंबात झाला. कतरिनाचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मिरी मुस्लिम आणि ब्रिटिश उद्योजक होते. तर तिची आई सुझॅन टरक्वेट या ख्रिश्चन आहेत. या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे कतरिना कोणत्याही धर्माचे पालन करते, याबद्दल लोकांना नेहमीच कुतूहल असते.
advertisement
4/7
कतरिना कैफ कोणत्याही एका विशिष्ट धर्माऐवजी सर्व धर्मांचा आदर आणि पालन करताना दिसते. ती फक्त विविध धर्मांचे सण-उत्सव साजरेच करत नाही, तर प्रत्येक धर्माच्या श्रद्धास्थळांनाही भेट देते.
advertisement
5/7
२०२१ मध्ये पंजाबी-हिंदू कुटुंबातील अभिनेता विकी कौशलसोबत तिने लग्न केले. त्यांचे लग्न पूर्णपणे हिंदू रितीरिवाजांनुसार झाले होते, जिथे दोघांनी सात फेरे घेतले. लग्नानंतर कतरिनाने विकीसोबत करवा चौथ, दिवाळी आणि होळी यांसारखे महत्त्वाचे हिंदू सण मोठ्या उत्साहाने साजरे करायला सुरुवात केली आहे.
advertisement
6/7
यासोबतच ती तिच्या आईसोबत ख्रिसमस देखील साजरा करते. इतकेच नव्हे तर, ती तिच्या मुस्लिम मित्र-मैत्रिणींसोबत ईदमध्येही सहभागी होताना दिसते.
advertisement
7/7
कतरिना कैफने तिच्या आयुष्यात तिच्या आई-वडिलांकडून मिळालेल्या संमिश्र संस्कृतीचा स्वीकार केला आहे. तिच्या या सर्वांसाठी समान दृष्टिकोनामुळेच ती केवळ एका धर्माच्या नव्हे, तर प्रत्येक धर्माच्या चाहत्यांची लाडकी आहे. आता विकी-कतरिनाच्या बाळाचे आगमन झाल्याने, त्यांचे हे छोटे कुटुंब सर्व धर्मांचे सण-उत्सव आनंदाने साजरे करेल, यात शंका नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Katrina Kaif Baby Boy : आई ख्रिश्चन, वडील मुस्लिम... मग कतरिना कैफ कोणता धर्म मानते? सर्वांसमोर करते 'ती' गोष्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल