1500 रुपये घेऊन दिल्लीहून मुंबईत आला, शाहरुख कसा बसला बॉलिवूडचा सर्वात श्रीमंत अभिनेता?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Shah Rukh Khan Expensive Things : शाहरुख खानला बॉलिवूडचा बादशाह उगाच म्हटलं जात नाही. बॉलिवूडचा बादशाह होण्यासाठी किंग खानने खूप मेहनत घेतली आहे. शाहरुखकडे पाच महागड्या गोष्टी आहेत.
advertisement
1/6

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान अत्यंत आलिशान पद्धतीने आपलं आयुष्य जगतो. नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानची नेटवर्थ 12,490 कोटी रुपये आहे. त्यामुळे शाहरुख खान बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेता बनला आहे. पाच मोल्यवान गोष्टींमुळे तो कोट्यवधींचा मालक बनला आहे. बॉलिवूडचा सर्वात श्रीमंत अभिनेता असणारा शाहरुख खान दिल्लीहून मुंबईत येताना खिशात फक्त 1500 रुपये घेऊन आला होता.
advertisement
2/6
रेड चिलीज एंटरटेनमेंट (प्रॉडक्शन हाऊस) : शाहरुख खानची सर्वाधिक कमाई त्याच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून होते. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, रेड चिलीज एंटरटेनमेंटची किंमत 500 कोटी रुपये आहे. 2002 मध्ये या प्रॉडक्शन हाऊसची सुरुवात झाली होती. या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरअंतर्गत 'मैं हूं ना','ओम शांति ओम' आणि 'चेन्नई एक्सप्रेस'सारख्या चित्रपटांची निर्मिती झाली आहे.
advertisement
3/6
मन्नत : कोणतीही व्यक्ती मुंबईला जाते तेव्हा तिचं स्वप्न असतं की शाहरुख खानच्या ‘मन्नत’ या घराला नक्की भेट देत असतो. हा एक 6 मजली, सी फेसिंग आलिशान बंगला आहे. फाइनेंशियल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, मन्नतची किंमत 200 कोटी रुपये आहे. शाहरुख खानच्या राजेशाही लाइफस्टाईलचा मन्नत एक अविभाज्य भाग आहे.
advertisement
4/6
आयपीएल टीम : शाहरुख खानच्या प्रॉडक्शन हाऊसनंतर जर कोणत्याही गोष्टीतून सर्वाधिक कमाई होते, तर ती त्याच्या IPL टीम कोलकाता नाईट रायडर्समुळे आहे. त्याच्या IPL टीमने तीन वेळा ट्रॉफी जिंकली आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा फक्त शाहरुख खान एकटाच मालक नसून जूही चावलादेखील या टीमचा भाग आहे.
advertisement
5/6
प्रायव्हेट जेट : शाहरुख खानकडे स्वतःचा प्रायव्हेट जेट आहे. त्याच्या प्रायव्हेट जेटची किंमत सुमारे 260 कोटी रुपयांच्या आसपास आहे. शाहरुख खानकडे असलेल्या सर्वात आलिशान वस्तूंपैकी प्रायव्हेट जेट एक आहे.
advertisement
6/6
अलीबागमधील बंगला : शाहरुख खानचा अलीबागमध्येही बंगला आहे. बीचचा नजारा, आलिशान इंटिरियर आणि वुडन डेकमुळे त्याचा अलीबागमधील बंगला लक्षवेधी झाला आहे. चित्रपटाच्या शूटिंगमधून वेळ मिळाला की शाहरुख खान अलीबागमधील आपल्या बंगल्यात राहायला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
1500 रुपये घेऊन दिल्लीहून मुंबईत आला, शाहरुख कसा बसला बॉलिवूडचा सर्वात श्रीमंत अभिनेता?