'मीही दिवाळी, ईदला मेलो तर…' असरानींच्या मृत्यूनंतर अन्नू कपूरनी सांगितली त्यांची शेवटची इच्छा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Annu Kapoor Last Wish : गोवर्धन असरानी यांचे दिवाळीच्या दिवशी निधन झाले. अन्नू कपूर यांनी त्यांच्या शेवटच्या इच्छेचा उल्लेख केला. ते नेमकं काय म्हणाले?
advertisement
1/8

बॉलीवूडचे ज्येष्ठ विनोदी कलाकार आणि अभिनेते गोवर्धन असरानी यांचं दिवाळीच्या दिवशी निधन झालं. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
advertisement
2/8
त्यांना मुंबईतील भारतीय आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फुफ्फुसात पाणी झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली.
advertisement
3/8
मृत्यूनंतर त्यांचे अंत्यविधी खासगी पद्धत केले जावेत अशी त्यांची शेवटची इच्छा होती. त्यांच्या इच्छेनुसार, त्यांचे अंत्यविधी झाल्यानंतर त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली.
advertisement
4/8
असरानी यांच्यानंतर आता प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते अन्नू कपूर यांनीही त्यांची शेवटची इच्छा सगळ्यांना सांगितली आहे.
advertisement
5/8
ANIला दिलेल्या मुलाखतीत अन्नू कपूर म्हणाले, "त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो. यात शंका नाही की ते एक उत्तम अभिनेता होते."
advertisement
6/8
"20 मार्च 2023 रोजी मी त्यांना 'नॉन स्टॉप धमाल'च्या सेटवर पाहिल्यांदा पाहिलं होतं. पण मला माहित नव्हते की ही त्यांची माझी शेवटची भेट असेल. त्यांचे शेवटचे दर्शन. आता मला ते माझ्या डायरीत लिहून ठेवावे लागेल."
advertisement
7/8
अन्नू कपूर पुढे म्हणाले, "त्यांच्या शेवटच्या इच्छेने मलाही प्रेरणा दिली. जेव्हा मला दुनिया नावाच्या या हॉटेलमधून बाहेर पडण्याची वेळ येते आणि ती तारीख आणि वेळ राष्ट्रीय सुट्टीशी जुळत असेल तर..."
advertisement
8/8
"15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी... किंवा इतर कोणताही सण, दिवाळी, होळी, ईद तेव्हा माझे अंतिम संस्कारही गुप्तपणे केले पाहिजेत. मी कोणालाही त्रास देऊ इच्छित नाही आणि मला या जगात ओझे म्हणून जगायचे नाही."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मीही दिवाळी, ईदला मेलो तर…' असरानींच्या मृत्यूनंतर अन्नू कपूरनी सांगितली त्यांची शेवटची इच्छा