TRENDING:

सुहागरातवर लिहिलेलं शाहरुखचं 'ते' हिट गाणं, 26 वर्षानंतरही उतरली नाही नशा

Last Updated:
सुहागरातवर तयार करण्यात आलेल्या गाण्यात एकही अश्लील शब्द नाही. ते गाणं आजही सहजपणे आपण गुणगुणतो.
advertisement
1/7
सुहागरातवर लिहिलेलं शाहरुखचं 'ते' हिट गाणं, 26 वर्षानंतरही उतरली नाही नशा
1998 साली आलेला दिल से सिनेमा खूप प्रसिद्ध झाला. शाहरुख खान आण मनीषा कोइराला यात प्रमुख भुमिकेत होते. प्रेक्षकांनी सिनेमाला खूप प्रेम दिलं. सिनेमातील गाणीही खूप हिट झाली. त्यातील एक गाणं प्रीति झिंटावर शुट करण्यात आलं होतं. आज त्या गाण्याची एक खास स्टोरी पाहूयात.
advertisement
2/7
हिंदी सिनेमात आजवर अनेक गाणी लिहिली गेली पण त्यातील काहीच गाणी प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. दिल से सिनेमात सुहागरातवर एक गाणं करण्यात आलं ज्याचे शब्द गुलझार यांनी लिहिले होते. या गाण्यानं नव्या नवरीच्या सुंदर अनुभवांची कहाणी सांगण्यात आली.
advertisement
3/7
सुहागरातवर तयार करण्यात आलेल्या या गाण्यात एकही अश्लील शब्द नव्हता. त्यामुळेच हे गाणं गुणगुणताना कोणाला लज्जा वाटत नाही. ते गाणं म्हणजेच जिया जले जान जले.
advertisement
4/7
जिया जले जान जले हे गाणं सुहागरातचं वर्णन करणारं गाणं आहे. अनेकांचा मुड रिफ्रेश करणारं हे गाणं आहे. गाण्याचं संगीतही मनाला स्पर्शून जातं.
advertisement
5/7
गाण्यातील शाहरुख आणि मनीषा कोइराला यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. मणिरत्नम यांच्या दिग्दर्शनात हे गाणं तयार करण्यात आलं. एआर रहमान यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं.
advertisement
6/7
अभिनेत्री प्रीति झिंटानं या सिनेमातून डेब्यू केला होता. सिनेमा हीट झालाच पण सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली. आजही सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या तोंडावर असतात.
advertisement
7/7
याच सिनेमातून अभिनेत्री मलायका अरोरा लाइमलाइटमध्ये आली होती. सिनेमातील ट्रेनच्या छतावरच छैया छैया हे गाणं तुफान हिट झालं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सुहागरातवर लिहिलेलं शाहरुखचं 'ते' हिट गाणं, 26 वर्षानंतरही उतरली नाही नशा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल