TRENDING:

22 वर्षांपूर्वी रिलीज झाली होती ब्लॉकबस्टर फिल्म, क्लायमॅक्स बघून ढसाढसा रडले प्रेक्षक, आजही टॉप ट्रेडिंग

Last Updated:
Shahrukh Khan Superhit Film: बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या या चित्रपटाचा शेवटचा सीन पाहून थिएटरमध्ये प्रेक्षकांना ढसाढसा रडू कोसळले होते.
advertisement
1/8
22 वर्षांपूर्वी रिलीज झाली ब्लॉकबस्टर फिल्म,क्लायमॅक्स बघून ढसाढसा रडले प्रेक्षक
मुंबई: आजपासून तब्बल २२ वर्षांपूर्वी, २००३ मध्ये एक असा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याने प्रेक्षकांच्या केवळ मनावरच नाही, तर त्यांच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावरही खोलवर परिणाम केला. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या या भावनिक चित्रपटाचा शेवटचा सीन पाहून थिएटरमध्ये प्रेक्षकांना ढसाढसा रडू कोसळले होते.
advertisement
2/8
हा सिनेमा आहे 'कल हो ना हो'. निखिल अडवाणी दिग्दर्शित या इमोशनल-रोमँटिक ड्रामा चित्रपटात शाहरुख खान आणि प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत होते, तर सैफ अली खान सहाय्यक भूमिकेत होता. याशिवाय जया बच्चन, सुष्मा सेठ, रीमा लागू यांसारखे दिग्गज कलाकार यात होते.
advertisement
3/8
न्यूयॉर्क शहरात राहणारी नैना आपल्या वडिलांच्या निधनानंतर एका तणावपूर्ण आणि नीरस आयुष्य जगत होती. तिची आई आणि आजी यांच्यातील सततच्या भांडणांमुळे तिच्या कुटुंबातील आनंद जणू हरवला होता.
advertisement
4/8
याच काळात त्यांच्या शेजारी अमन माथुर नावाचा एक आनंदी आणि उत्साही तरुण राहायला येतो. अमनचे हसणे आणि त्याची सकारात्मक विचारसरणी नैनाच्या कुटुंबाला पुन्हा एकत्र आणते आणि नैनाही जीवनाला नव्या दृष्टिकोनातून पाहू लागते.
advertisement
5/8
अमनच्या सकारात्मकतेमुळे नैनाचे आयुष्य फुलू लागते आणि हळूहळू ती अमनच्या प्रेमात पडते. पण, अमनने सर्वांपासून एक मोठे रहस्य लपवून ठेवले होते, त्याला हृदयाचा गंभीर आजार असतो आणि तो लवकरच जगाचा निरोप घेणार असतो.
advertisement
6/8
आपल्या जाण्यानंतर नैनाला होणाऱ्या त्रासातून वाचवण्यासाठी, अमनने तिला आपला जिवलग मित्र रोहित याच्यासोबत एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. नैना आणि रोहितला एकत्र आणण्यासाठी अमन करत असलेला त्याग आणि प्रयत्न ही या चित्रपटातील अत्यंत हृदयस्पर्शी गोष्ट आहे.
advertisement
7/8
या चित्रपटाचा शेवटचा सीन आणि सोनू निगमच्या आवाजातील 'कल हो ना हो' हे शीर्षक गीत आजही प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणते. 'हा क्षण आहे, तो जगून घे, उद्या असेल किंवा नसेल...' असा जीवनाचा खरा अर्थ या गाण्याने शिकवला.
advertisement
8/8
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि आजही तो शाहरुख खानच्या टॉप-रेटेड चित्रपटांपैकी एक मानला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
22 वर्षांपूर्वी रिलीज झाली होती ब्लॉकबस्टर फिल्म, क्लायमॅक्स बघून ढसाढसा रडले प्रेक्षक, आजही टॉप ट्रेडिंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल