TRENDING:

वडिलांपेक्षाही 10 वर्षांनी मोठा, 83 वर्षाच्या अभिनेत्यासोबत श्रद्धा कपूरला जायचंय ड्रीम डेटवर

Last Updated:
Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरने एका व्यक्तीसोबत कॉफी डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या व्यक्तीचं नाव ऐकूण सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
advertisement
1/7
83 वर्षाच्या अभिनेत्यासोबत श्रद्धा कपूरला जायचंय ड्रीम डेटवर
'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर एका स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांना सांगितले की तो श्रद्धा कपूरचा सर्वात मोठा चाहता आहे. त्याने हेही सांगितले की त्याला श्रद्धा कपूरला कॉफी डेटवर न्यायचे आहे. मात्र अभिनेत्रीच्या प्रतिक्रियेमुळे संपूर्ण खेळच पलटलेला पाहायला मिळाला आहे.
advertisement
2/7
'कौन बनेगा करोड़पति 17'च्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये एका स्पर्धकाने शोमध्ये अमिताभ बच्चन यांना सांगितले की तो त्यांचा सर्वात मोठा चाहता आहे. यानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने यावर प्रतिक्रिया दिली.
advertisement
3/7
श्रद्धाने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर करत सांगितले की ती बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची सर्वात मोठी चाहती आहे आणि तिला त्यांच्या सोबत कॉफी प्यायची आहे.
advertisement
4/7
KBC 17 च्या नव्या एपिसोडदरम्यान स्पर्धकाने अमिताभ यांना म्हटले,“मला वाटते माझ्यासारखा श्रद्धाचा इतका वेडा चाहता कुणीच नसेल. सर, छोट्या तोंडी मोठी गोष्ट वाटेल, पण मला श्रद्धा जींना फक्त एकदाच डेटवर न्यायचं आहे.” हे ऐकून तिथे उपस्थित सगळेच आश्चर्यचकित झाले आणि अमिताभ बच्चन यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिली.
advertisement
5/7
अमिताभ यांनी विचारले की त्यांना श्रद्धाच्या वडिलांचे नाव माहीत आहे का? त्यावर स्पर्धकाने उत्तर दिले की हो, ते शक्ती कपूर आहेत, ज्यांना ‘क्राइममास्टर गोगो’ म्हणून ओळखले जाते. अमिताभ हसले आणि मग कॅमेऱ्याकडे पाहत श्रद्धाला विनंती केली की जर ती खरंच हा कार्यक्रम पाहत असेल, तर या ऑफरचा नक्की विचार करावा—त्याच्यासोबत डेटवर जावे आणि कॉफी प्यावी. अमिताभ बच्चन यांचं हे वक्तव्य ऐकून श्रद्धाचा चाहता हसला आणि दिग्गज अभिनेत्याचे आभार मानले.
advertisement
6/7
श्रद्धा कपूरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं आहे,"अमिताभ बच्चन सर, मी तुमची सर्वात मोठी चाहती आहे. सर्वात आधी तुम्ही माझ्यासोबत कॉफी प्या". पुढे ती म्हणाली, "तुम्ही प्रत्येक गोष्ट क्लासी, सुसंस्कृत आणि सुंदर बनवता. जगातील सर्वोत्तम होस्ट".
advertisement
7/7
श्रद्धाने 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तीन पत्ती’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयात पदार्पण केले होते. यात अमिताभ बच्चनही होते. अभिनेत्री शेवटची ‘स्त्री 2’ या हॉरर कॉमेडीमध्ये दिसली होती. ही फिल्म ब्लॉकबस्टर ठरली. सध्या ती आपल्या व्यवसायासोबतच आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्येही व्यस्त आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
वडिलांपेक्षाही 10 वर्षांनी मोठा, 83 वर्षाच्या अभिनेत्यासोबत श्रद्धा कपूरला जायचंय ड्रीम डेटवर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल