IND vs SL : वर्ल्ड कप विजयाच्या 50 दिवसानंतर टीम इंडिया मैदानात, फायनल खेळलेल्या दोघींना Playing XI मध्ये जागा नाही!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय महिला टीम बरोबर 50 दिवसांनी मैदानात उतरत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजला सुरूवात झाली आहे.
advertisement
1/5

भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजचा पहिला सामना विशाखापट्टणममध्ये होत आहे. या सामन्यात टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.
advertisement
2/5
महिला वर्ल्ड कपमध्ये विशाखापट्टणममध्ये झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभूत केलं होतं, पण आता टीम इंडिया या मैदानात वेगळ्या फॉरमॅटमध्ये खेळत आहे.
advertisement
3/5
50 दिवसांपूर्वी वर्ल्ड कप फायनल खेळलेल्या बहुतेक खेळाडू श्रीलंकेविरुद्धची पहिली टी-20 मॅचही खेळत आहेत. फक्त राधा यादव आणि रेणुका सिंग ठाकूर या वर्ल्ड कप फायनल खेळलेल्या दोघी श्रीलंकेविरुद्ध मैदानात दिसणार नाहीत. त्यांच्याऐवजी वैष्णवी शर्मा आणि अरुंधती रेड्डी यांना संधी मिळाली आहे.
advertisement
4/5
महिला टी-20 वर्ल्ड कपला आता फक्त 175 दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे वनडे वर्ल्ड कप विजयानंतर आता टी-20 वर्ल्ड कप विजयासाठीही टीम इंडियाची तयारी सुरू झाली आहे.
advertisement
5/5
भारताची प्लेइंग इलेव्हन : स्मृती मानधाना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर, रिचा घोष, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, श्री चरणी
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SL : वर्ल्ड कप विजयाच्या 50 दिवसानंतर टीम इंडिया मैदानात, फायनल खेळलेल्या दोघींना Playing XI मध्ये जागा नाही!