Soham-Pooja : 'त्या बिचाऱ्याची मला दया येते' लग्नानंतर थाटला वेगळा संसार, आता सोहमबद्दल पूजाचं शॉकिंग वक्तव्य
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Soham Bandekar-Pooja Birari: २ डिसेंबर २०२५ रोजी लोणावळ्याच्या निसर्गरम्य वातावरणात सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच पूजाने एक असा खुलासा केला आहे, जो ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
advertisement
1/9

मुंबई: 'होम मिनिस्टर' फेम आणि महाराष्ट्राचे लाडके आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम बांदेकर नुकताच लग्नबंधनात अडकला. सोहमने अभिनेत्री पूजा बिरारीसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाची चर्चा अजूनही थांबलेली नाही.
advertisement
2/9
२ डिसेंबर २०२५ रोजी लोणावळ्याच्या निसर्गरम्य वातावरणात या जोडीने सप्तपदी घेतल्या आणि आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात केली.
advertisement
3/9
पण लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच पूजाने एक असा खुलासा केला आहे, जो ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. "मुलींनाच घर सोडावं लागतं असं नाही, माझ्या बाबतीत तर सोहमच घर सोडून आलाय," असं पूजाने म्हटलंय!
advertisement
4/9
लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात मोठे बदल होतात, असं आपण नेहमी ऐकतो. पण पूजा बिरारीचं मत जरा हटके आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूजा म्हणाली, "लग्नानंतर माझ्या आयुष्यात फार मोठा बदल झालाय असं मला वाटत नाही. कारण मी लग्नाआधीपासूनच मुंबईत एकटी राहत होते, स्वतःचं घर सांभाळत होते. उलट आता मला आनंद आहे की, मला आयुष्यभरासाठी एक हक्काचा रुममेट मिळाला आहे."
advertisement
5/9
पूजाच्या मते, या लग्नानंतर खरा बदल सोहमच्या आयुष्यात झाला आहे. ती गंमतीने म्हणाली, "खरं तर मला सोहमची दया येते, कारण तो त्याचं हक्काचं घर सोडून माझ्यासोबत राहायला आलाय. आम्ही दोघांनी आमच्या कामाच्या ठिकाणापासून जवळ पडेल असं एक नवीन घर पाहिलं आहे. त्यामुळे घरापासून दूर राहण्याचा जो स्ट्रगल मुलींना करावा लागतो, तो सध्या सोहम करतोय!"
advertisement
6/9
काही दिवसांपूर्वी पूजाने हातात घराची चावी असलेला एक फोटो शेअर केला होता, तेव्हापासूनच बांदेकरांचा लेक वेगळा राहणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या.
advertisement
7/9
मुलाने लग्नानंतर वेगळं राहणं, हे भारतीय समाजात आजही वादाचं कारण ठरू शकतं. पण बांदेकर कुटुंब याला अपवाद ठरलं आहे. सोहमची आई आणि प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी सोहमच्या लग्नाआधीच यावर अत्यंत प्रगल्भ भूमिका मांडली होती.
advertisement
8/9
सुचित्रा म्हणाल्या होत्या, "आदेशच्या आईने आम्हाला जो सल्ला दिला होता, तोच मी सोहमला दिलाय. लग्न झाल्यावर मुलांनी आपला स्वतःचा संसार स्वतः थाटायला हवा. एकमेकांना समजून घेण्यासाठी, जबाबदारी घेण्यासाठी वेगळं राहणं गरजेचं असतं."
advertisement
9/9
त्या पुढे म्हणाल्या, "मी सोहमला स्पष्ट सांगितलंय की, लग्नानंतर तुम्ही तुमचं विश्व निर्माण करा. तुम्हाला काही लागलं तर मी आहेच, रोज घरी जेवायला या, पण तुमचा संसार तुम्हीच सांभाळा." सुचित्रा यांच्या या आधुनिक विचारांचं सध्या सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Soham-Pooja : 'त्या बिचाऱ्याची मला दया येते' लग्नानंतर थाटला वेगळा संसार, आता सोहमबद्दल पूजाचं शॉकिंग वक्तव्य