Weather Alert: महाराष्ट्रावर संकट पुन्हा वाढलं, थंडीचं तुफान येतंय! हवामान विभागाचा अलर्ट
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून अचानक पारा घसरला आहे. सोमवारी 7 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
1/7

महाराष्ट्रातील हवामानात अचानक मोठे बदल जाणवत असून पारा घसरला आहे. रविवारी मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये शीतलहर अनुभवायला मिळाली. तर सोमवारी संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांत थंडीची लाट असणार आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. 22 डिसेंबरचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरात सकाळच्या वेळी दाट धुक्याची शक्यता आहे. तर किमान तापमान देखील वाढणार आहे. मुंबईत किमान तापमान 20 अंश सेल्सिअस एव्हढं असेल. तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
3/7
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात थंडीची लाट जाणवत आहे. सोलापूर आणि पुण्यातील तापमान 9 ते 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. सोमवारी देखील बर्फासारखी थंडी जाणवणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गरम कपडे परिधान करावे, असा सल्ला देण्यात आला आहे. पुण्यात देखील सकाळी दाट धुके राहील.
advertisement
4/7
संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात हिम लहर येणार आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान 10 ते 12 अंश सेल्सिअस असेल.
advertisement
5/7
मराठवाड्यात किमान तापमान 13 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. मराठवाडा देखील थंडीने गारठणार आहे. नांदेड, परभणी, जालना सह सर्व जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारी देखील मराठवाड्यात पारा घसरणार असून गारठा वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
विदर्भात तापमानात मोठी घट झाली असून पारा ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे थंडीची तीव्रता वाढली असून सोमवारी देखील हीच स्थिती कायम राहणार आहे. उपराजधानी नागपूरमध्ये किमान तापमान 9 अंशांपर्यंत घसरेल.
advertisement
7/7
दरम्यान, राज्यातील बहुतांश भागात शीत लहरीची स्थिती आहे. पारा 10 अंशांच्या खाली गेला असून दिवसभर गारठा जाणवत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असून नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. गरम कपडे वापरावे. तसेच धुक्याच्या काळात वाहनांसह बाहेर जाताना काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: महाराष्ट्रावर संकट पुन्हा वाढलं, थंडीचं तुफान येतंय! हवामान विभागाचा अलर्ट