'सिंघम' अभिनेत्री, 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम; लाडकी खलनायिका काळ्याच्या पडद्याआड
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Suhasini Deshpande death: मराठी सिनेसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन झालंय. त्यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरलीय. पुण्यात राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.
advertisement
1/7

मराठी सिनेसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन झालंय. त्यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरलीय. पुण्यात राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.
advertisement
2/7
सुहासिनी यांच्यावर पुण्यातच अंत्यसंस्कार होणार आहेत. बुधवार, 28 ऑगस्ट उद्या वैकुंठ स्मशानभूमीत अभिनेत्रीच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात येणार आहे.
advertisement
3/7
जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी त्यांनी अभिनयाला सुरुवात केली होती.
advertisement
4/7
गेल्या 70 वर्षात त्यांनी 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलंय. दमदार अभिनय कौशल्यानं त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. मात्र आज त्यांच्या जाण्याने कलासृष्टीवर शोककळा पसरली आहे.
advertisement
5/7
सुहासिनी देशपांडे यांनी देवकीनंदन गोपाला, वारसा लक्ष्मीचा, काळूबाईच्या नावानं चांगभलं, पुढचं पाऊल, आज झाले मुक्त मी, धग, माहेरचा आहेर, गड जेजुरी, आम्ही दोघे राजा राणी, बाईसाहेब, मानाचं कुंकू मानाचा मुजरा अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.
advertisement
6/7
रंगभूमीवरही त्यांनी काम केलं. रंगभूमीशी सतत संलग्न राहून तुझं आहे तुझ्या पाशी, कथा अकलेच्या कांद्याची, बेल भंडार, सुनबाई घर तुझंच आहे, राजकारण गेलं चुलीत, चिरंजीव आईस, सासूबाईंचं असंच असतं, लग्नाची बेडी अशा नाटकांचे हजारो प्रयोग त्यांनी केले आहेत.
advertisement
7/7
बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचा 2011 चा सुपरहिट चित्रपट 'सिंघम' मध्येही सुहासिनी देशपांडे यांनी काम केलं होतं. या चित्रपटात त्यांनी काजल अग्रवालच्या आजीची भूमिका साकारली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'सिंघम' अभिनेत्री, 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम; लाडकी खलनायिका काळ्याच्या पडद्याआड