'हिरो को कोई नंगा नही दिखा सकते', सिनेमाची न्यूड पोस्टर्स पाहून भडकली होती मराठी अभिनेत्री, घेतलेला बॉलिवूडचा क्लास
- Published by:Minal Gurav
Last Updated:
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली. बॉलिवूडमध्ये काम करत असताना सिनेमाची न्यूड पोस्टर्स पाहून ती चांगलीच भडकली होती.
advertisement
1/8

70 आणि 80 च्या दशकातील सिनेमांची आठवण काढली जाते तेव्हा तेव्हा अभिनेत्री स्मिता पाटीलचा उल्लेख आवर्जून केला जातो. एक सशस्त महिला आणि अभिनेत्री म्हणून तिनं निर्माण केलेली ओळख आजवर कोणीही पुसू शकलेलं नाही.
advertisement
2/8
अनेक सशक्त स्त्रीप्रधान सिनेमा स्मिताच्या वाट्याला आले ज्याचं तिनं सोनं केलं. इंडस्ट्रीतील महिलांच्या प्रतिनिधित्वाबद्दल स्मितानं गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. सिनेमातील अश्लीलता आणि नग्नतेवर टीका केली होती.
advertisement
3/8
अभिनेत्रींना अर्धवट कपडे घालते म्हणजे सिनेमा यशस्वी होता अशी समज असणाऱ्या अनेक निर्मात्यांवर स्मितानं टीका केली होती. तिच्या एका जुन्या मुलाखतीमधील तिनं केलेली ही टीका पुन्हा चर्चेत आली आहे.
advertisement
4/8
स्मिता पाटीलची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अभिनेत्रीने प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी सिनेमांमध्ये अश्लीलता भरलेली असते या मानसिकतेवर उघडपणे टीका केली. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी महिलांना अर्ध्या कपड्यांमध्ये दाखवणे आवश्यक आहे असं निर्मात्यांना वाटतं, असंही स्मिता म्हणाली.
advertisement
5/8
स्मिता म्हणाली होती, "तुम्ही हिरोला नग्न दाखवू शकत नाही, त्याचा काही फायदाही होणार नाही. पण जर तुम्ही एखाद्या महिलेला नग्न दाखवले तर त्यांना वाटते की आणखी 100 लोक येतील. भारतीय प्रेक्षकांना असे सिनेमे पाहण्यास भाग पाडलं गेलं आहे कारण त्यात सेक्स आणि अश्लीलता आहे."
advertisement
6/8
"पहा त्यात सेक्स आहे, अर्धनग्न शरीरे आहेत, म्हणून तुम्ही चित्रपट पाहण्यासाठी यावे. ही एक चुकीची वृत्ती बनली आहे. जर एखादा सिनेमा हिट होणार असेल, जर तो खऱ्या मनाने लिहिलेला असेल तर तो हिट होईल. अशा पोस्टरमुळे सिनेमा चालत नाही."
advertisement
7/8
स्मिता पाटीलची ही व्हिडिओ क्लिप रेडिटवर शेअर करत एका युझरनं लिहिलंय, अभिनेत्रीने त्यावेळी जे म्हटलं होतं ते आजही खरं आहे. संदीप रेड्डी वांगा सारखे निर्माते असा विश्वास करतात की सिनेमांमध्ये नग्नता आणि अश्लीलता दाखवून ते प्रेक्षकांना त्यांच्या सिनेमांकडे आकर्षित करू शकतात.
advertisement
8/8
स्मिता पाटील ही एक अशी अभिनेत्री होती जी सिनेमांमध्ये महिलांच्या मर्यादित भूमिका आणि वस्तुनिष्ठतेला जोरदारपणे विरोध करत होती. 'भूमिका', 'मंथन', 'आक्रोश', 'अर्ध सत्य' आणि 'मिर्च मसाला' यासारख्या सिनेमांमध्ये अभिनेत्रीनं केवळ सौंदर्याच्या बाबतीतच नव्हे तर त्यांच्या शक्ती, विचार आणि अंतर्गत संघर्षांच्या बाबतीतही महिलांचं चित्रण केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'हिरो को कोई नंगा नही दिखा सकते', सिनेमाची न्यूड पोस्टर्स पाहून भडकली होती मराठी अभिनेत्री, घेतलेला बॉलिवूडचा क्लास