Soham Bandekar Kelvan : बांदेकरांच्या घरी लगीन घाई! सोहमच्या कपाळी मुंडावळ्या, केळवणाला सुरूवात, PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Soham Bandekar Kelvan : अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरचं अभिनेत्री पूजा बिरारीशी लग्न होतंय. नुकतंच सोहम बांदेकरचं केळवण पार पडलंय. केळवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
advertisement
1/9

महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणजेच आदेश बांदेकर लवकरच सासरे होणार आहेत. बांदेकरांच्या घरी लगीन घाई सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून आदेश बांदेकर यांचा मुलगा अभिनेता सोहम बांदेकरच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या.
advertisement
2/9
सोहम बांदेकर 'याड लागलं प्रेमाचं' या मालिकेतील अभिनेत्री पूजा बिरारीला डेट करत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती.
advertisement
3/9
दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अधिकृतपणे भाष्य केलं नव्हतं. पण दोघांच्या वागण्यातून आणि बोलण्यात या चर्चांना दुजोरा मिळत गेला.
advertisement
4/9
अभिनेत्री आणि सोहमची आई सुचित्रा बांदेकर यांनीही एका मुलाखतीत मुलाच्या लग्नाची उत्सुकता बोलून दाखवली होती. लेकाच्या लग्नात लाखांचा पैठणी घालून मिरवणार असंही त्या म्हणाल्या होत्या.
advertisement
5/9
अखेर सोहम बांदेकर लग्न करतोय आणि त्याच्या केळवणाला सुरूवात झाली आहे. नुकतंच त्याचं पहिलं केळवण पार पडलं असून केळवणाचे फोटो समोर आलेत. आस्वाद उपहारगृहात सोहमचं केळवण पार पडलं. त्याच्या लाडक्या मावश्यांनी त्याचं केळवण केलं.
advertisement
6/9
अभिनेत्री सुकन्या मोने यांनी सोहमसाठी खास पोस्ट लिहिली आहे. आस्वादच्या ऑफिशिअल इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. अभिनेत्री सुकन्या मोने,पूर्वा गोखले, शिल्पा नवलकर आणि अभिजीत केळकर यांनी सोहमचं केळवण केलं. सोहमला मुंडावळ्या बांधून त्याचं छान औक्षण केलं. त्याला प्रेमाची भेटवस्तू दिली.
advertisement
7/9
सुकन्या मोने यांनी पोस्टमध्ये केळवणाचा चमचमीत मेन्यू देखील शेअर केला. त्यांनी सांगितलं, "सोहम बांदेकर.... सुचित्रा आणि आदेश बांदेकर ह्यांचा मुलगा. लवकरच हसत हसत आनंदाने लग्नबंधनात अडकणार आहे म्हणून त्याच्या सगळ्या मावश्या सुकन्या,पूर्वा, शिल्पा (ऋजुताची कमतरता जाणवली)आणि अभिजित मामाने त्याचे केळवण केले. आणि पारंपरिक, सात्विक केळवण ' आस्वाद ' शिवाय दुसरीकडे कुठे होऊच शकत नाही."
advertisement
8/9
"आल्याआल्या फुलांच्या पायघड्या घातल्या. पेढा आणि चाफ्याच्या फुलांनी त्यांचे स्वागत केलं. नंतर औक्षण केलं. छान ताटाभोवती मोत्याची महिरप घातली तिघांच्या."
advertisement
9/9
सुकन्या मोने यांनी केळवणाचा मेन्यू सांगितला. त्या म्हणाल्या, "वडा आणि कोथिंबीर वडीने सुरुवात झाली. पंच पक्वान्न होती जेवणाला. खरवस, दुधी हलवा, बासुंदी, श्रीखंड आणि मोदक बाकी 3 भाज्या, कढी, मसाले भात, पुऱ्या, कोशिंबीर, ताक, कुरडई असे पोटभर जेऊन त्यांना आहेर दिला आणि समाधानाने आपापल्या घरी गेलो."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Soham Bandekar Kelvan : बांदेकरांच्या घरी लगीन घाई! सोहमच्या कपाळी मुंडावळ्या, केळवणाला सुरूवात, PHOTO