TRENDING:

कोणी केला पळून जाण्याचा प्रयत्न, कोणी मारली कानाखाली; BIGG BOSS हिंदीमध्ये मराठमोळ्या स्पर्धकांचा राडा!

Last Updated:
Marathi Celebrities in Hindi Bigg Boss: आजवर अनेक मराठी कलाकारांनी हिंदी बिग बॉसच्या घरात आपला मराठी स्वॅग दाखवत बॉलिवूडच्या दिग्गजांनाही पाणी पाजलं. चला तर मग, पाहूया कोणत्या मराठी चेहऱ्यांनी हिंदी बिग बॉसमध्ये आपला ठसा उमटवला.
advertisement
1/21
BIGG BOSS हिंदीमध्ये मराठमोळ्या स्पर्धकांचा राडा!
मुंबई: महाराष्ट्राच्या घराघरांत सध्या फक्त एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे 'बिग बॉस मराठी'चं सहावं पर्व! येत्या रविवारी, ११ जानेवारीला रितेश भाऊंच्या 'धक्क्या'वर नवीन चेहरे कोण असणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
advertisement
2/21
पण या नवीन लाटेत जुन्या आठवणींना उजाळा मिळणं स्वाभाविक आहे. आजवर अनेक मराठी कलाकारांनी हिंदी बिग बॉसच्या घरात आपला मराठी स्वॅग दाखवत बॉलिवूडच्या दिग्गजांनाही पाणी पाजलं. चला तर मग, पाहूया कोणत्या मराठी चेहऱ्यांनी हिंदी बिग बॉसमध्ये आपला ठसा उमटवला.
advertisement
3/21
प्रणित मोरे - सीझन १९: समंजस आणि शांत स्वभाव, पण मुद्द्यांवर आपलं म्हणणं ठामपणे मांडण्याची वृत्ती यामुळे प्रणित या सीझनमधील चर्चित स्पर्धकांपैकी एक होता. सुरूवातीला त्याला हलक्यात घेतलं गेलं. मात्र, या सीझनमध्ये सर्वाधिक नॉमिनेट होऊनही त्याने ज्याप्रकारे कमबॅक केलं, ते पाहून भल्याभल्यांना घाम फुटला. या सीझनमध्ये प्रणितला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
advertisement
4/21
शिल्पा शिरोडकर - सीझन १८: ९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री शिल्पा शिरोडकर या सीझनमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या स्पर्धकांपैकी एक होती. विवियन डीसेना आणि करणवीर मेहरासोबतची तिची मैत्री, त्यांच्यातील वाद आणि गोंधळ यामुळे ती टॉप ६ पर्यंत पोहोचली.
advertisement
5/21
अंकिता लोखंडे - सीझन १७ : आपला पती विकी जैनसोबत एन्ट्री घेणाऱ्या अंकितासाठी हा सीझन खूप संघर्षाचा ठरला. आपल्या नात्यातील चढ-उतार मोकळेपणाने मांडणारी अंकिता या पर्वात थर्ड रनरअप ठरली.
advertisement
6/21
शिव ठाकरे - सीझन १६: 'बिग बॉस मराठी' जिंकून हिंदीत गेलेल्या शिवने आपली 'मंडळी' तयार केली. साजिद खान आणि अब्दू रोजिकसोबतची त्याची मैत्री खूप गाजली. तो या सीझनचा रनरअप ठरला, पण लोकांच्या मनात त्याने घर केलं.
advertisement
7/21
जिया शंकर - OTT २: जिया शंकरने आपल्या रोखठोक मतांनी ओटीटीच्या दुसऱ्या पर्वात खळबळ उडवून दिली. ती ६ व्या क्रमांकावर राहिली असली, तरी तिची फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणात वाढली.
advertisement
8/21
तेजस्वी प्रकाश - सीझन १५: महाराष्ट्राच्या लेकीने हिंदी बिग बॉसची ट्रॉफी घरी आणली! तेजस्वीचा बडबड्या स्वभाव आणि तिचा खेळ प्रेक्षकांना खूप भावला. या विजयाने तिला एका रात्रीत सुपरस्टार बनवलं.
advertisement
9/21
राकेश बापट OTT १: राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांची केमिस्ट्री या सीझनचं मुख्य आकर्षण होती. प्रकृतीच्या कारणास्तव त्याला सीझन १५ मधून लवकर बाहेर पडावं लागलं, पण त्यांची जोडी आजही फॅन्सच्या लक्षात आहे.
advertisement
10/21
निशांत भट - OTT १ आणि सीझन १५: निशांत भटने आपल्या कोरिओग्राफीच्या कौशल्याने आणि चतुर खेळीने सर्वांची मनं जिंकली. 'बिग बॉस ओटीटी' मध्ये तो रनरअप ठरला, तर सीझन १५ मध्ये तो फायनलिस्ट होता.
advertisement
11/21
राहुल वैद्य - सीझन १४: राहुल वैद्यने रुबिनासोबत घेतलेला पंगा आणि दिशा परमारला नॅशनल टीव्हीवर केलेलं प्रपोज, या दोन गोष्टींनी इतिहास रचला. स्वेच्छेने बाहेर पडून पुन्हा एन्ट्री घेणारा राहुल या पर्वात दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
advertisement
12/21
निक्की तांबोळी - सीझन १४: बोल्ड आणि बिंधास्त! निक्कीने कोणालाही न घाबरता आपला खेळ खेळला. सीझन १४ ची पहिली कन्फर्म फायनलिस्ट बनण्याचा मान तिला मिळाला आणि तिने टॉप ३ मध्ये स्थान पटकावलं.
advertisement
13/21
हिंदुस्तानी भाऊ - सीझन १३: विकासा फाटक उर्फ 'हिंदुस्तानी भाऊ'ने आपल्या खास मुंबईया भाषेनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. शेफली जरीवालासोबतची त्याची मैत्री आणि त्याचे वन लाइनर खूप गाजले.
advertisement
14/21
मेघा धाडे - सीझन १२: मराठी बिग बॉसचं पहिलं पर्व जिंकल्यानंतर मेघाने हिंदीत एन्ट्री घेतली. 'ड्रामा क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेघाने हिंदीच्या घरातही मराठी ठसका कायम ठेवला आणि आपली तगडी ओळख निर्माण केली.
advertisement
15/21
नेहा पेंढसे - सीझन १२: नेहा पेंढसेचा खेळ अतिशय सभ्य आणि सरळ होता. दीपिका कक्करसोबत तिची छान गट्टी जमली होती, पण दुर्दैवाने २९ व्या दिवशी ती घराबाहेर पडली. तिच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळे चाहते नाराज झाले होते.
advertisement
16/21
शिल्पा शिंदे - सीझन ११: हिंदी बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय विजेत्यांपैकी एक म्हणजे शिल्पा शिंदे! १०५ दिवस किचन सांभाळण्यापासून ते विकास गुप्तासोबतच्या संघर्षापर्यंत, शिल्पाने हा शो गाजवला आणि ट्रॉफीवर नाव कोरलं.
advertisement
17/21
लोपामुद्रा राऊत - सीझन १०: मिस युनायटेड कॉन्टिनेन्टची मानकरी असलेल्या लोपाने सौंदर्यासोबतच ताकदही दाखवली. प्रत्येक टास्क जिद्दीने पूर्ण करणारी लोपा या पर्वात तिसऱ्या क्रमांकावर राहिली. रोहन मेहरासोबतची तिची मैत्री प्रेक्षकांना खूप आवडली.
advertisement
18/21
सोनाली राऊत - सीझन ८: सोनाली राऊतने तब्बल १०० दिवस घरात टिकून राहण्याची किमया साधली. अली कुली मिर्झाला लगावलेली थप्पड ही त्या सीझनमधील सर्वात मोठी कॉन्ट्रोव्हर्सी ठरली होती, ज्यासाठी तिला पूर्ण सीझनभर नॉमिनेट व्हावं लागलं होतं.
advertisement
19/21
अदिती गोवित्रीकर - सीझन ३: अमिताभ बच्चन यांनी होस्ट केलेल्या या पर्वात अदितीने ७७ दिवस संयमी खेळ केला. मिसेस वर्ल्डचा किताब जिंकलेली अदिती सेमीफिनालेपर्यंत पोहोचली. तिच्या शांत आणि समंजस स्वभावामुळे तिला या सीझनची सर्वात चांगली स्पर्धक मानलं गेलं.
advertisement
20/21
राहुल महाजन - सीझन २: पायल रोहतगीसोबतचा रोमान्स असो किंवा भिंत ओलांडून पळून जाण्याचा प्रयत्न, राहुल महाजनने या पर्वात सस्पेन्स कायम ठेवला होता. नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्याला घराबाहेर जावं लागलं, पण तो या शोचा सर्वात लोकप्रिय चेहरा ठरला.
advertisement
21/21
राखी सावंत - सीझन १: बिग बॉसच्या पहिल्याच सीझनमध्ये राखीने अक्षरशः राडा घातला होता. रूपाली गांगुली आणि कश्मिरा शाहसोबतचे तिचे वाद आजही फॅन्सच्या लक्षात आहेत. एकदा बाद होऊनही वाईल्ड कार्ड म्हणून पुन्हा एन्ट्री घेणारी राखी या शोची ड्रामा क्वीन ठरली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कोणी केला पळून जाण्याचा प्रयत्न, कोणी मारली कानाखाली; BIGG BOSS हिंदीमध्ये मराठमोळ्या स्पर्धकांचा राडा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल