TRENDING:

Pranit More: कंडक्टरचा मुलगा ते 'बिग बॉस'चा फायनलिस्ट! प्रणित मोरेने देशभरात उंचावली महाराष्ट्राची मान

Last Updated:
Pranit More Bigg Boss 19: एका साध्या बेस्ट बस कंडक्टरच्या घरी जन्मलेल्या आणि दादरच्या चाळीत वाढलेल्या या मुलाने आज थेट सलमान खानच्या रिअॅलिटी शोच्या अंतिम टप्प्यात धडक मारली आहे!
advertisement
1/8
कंडक्टरचा मुलगा ते बिग बॉसचा फायनलिस्ट! प्रणित मोरेने उंचावली महाराष्ट्राची मान
मुंबई: आयुष्याच्या शर्यतीत प्रत्येकजण धावतो, पण काही जणांची कहाणी अशी असते, जी फक्त धावत नाही, तर लोकांना धावायला शिकवते. 'बिग बॉस १९' चा फायनलिस्ट आणि महाराष्ट्राचा लाडका कॉमेडियन प्रणित मोरे याची संघर्षमय कहाणी अशीच प्रेरणा देणारी आहे.
advertisement
2/8
एका साध्या बेस्ट बस कंडक्टरच्या घरी जन्मलेल्या आणि दादरच्या चाळीत वाढलेल्या या मुलाने आज थेट सलमान खानच्या रिअॅलिटी शोच्या अंतिम टप्प्यात धडक मारली आहे!
advertisement
3/8
प्रणितचे वडील मुंबई बेस्टमध्ये बस कंडक्टर होते. वडिलांच्या सरकारी नोकरीमुळे त्याचे बालपण दादरच्या चाळीत गेले. पण एका दुर्दैवी अपघातात वडिलांना पायाला गंभीर दुखापत झाली आणि नोकरी सुटली.
advertisement
4/8
नोकरी गेल्याने कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. या परिस्थितीमुळे त्यांना मुंबईतून नवी मुंबईत स्थलांतर करावे लागले. घर चालवण्याचे आव्हान मोठे होते. घर चालवण्यासाठी प्रणितच्या आई-वडिलांनी हार न मानता टिफिन सर्व्हिसचा छोटा व्यवसाय सुरू केला.
advertisement
5/8
हा तो काळ होता, जेव्हा प्रणितने शिक्षणासोबतच घरोघरी टिफिन पोहोचवण्याचेही काम केले. वडिलांना नवीन व्यवसायात मोठे नुकसान झाले, ज्यामुळे त्यांना घर-दुकान सर्व विकावे लागले. तेव्हा भाड्याच्या घरात राहणाऱ्या लहानग्या प्रणितने आईसाठी स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहिले.
advertisement
6/8
टिफिन सर्व्हिसने प्रणितला आयुष्यातील चढ-उतारांना सामोरे जायला शिकवले. शाळा संपल्यावर त्याने कार सेल्समनची पहिली नोकरी धरली. त्याची मेहनत, जिद्द आणि संघर्ष फळले.
advertisement
7/8
यानंतर तो आरजे (RJ) बनला, तिथेच एका सिनिअरच्या सल्ल्यानुसार त्याने स्टँड-अप कॉमेडी सुरू केली आणि हाच त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही.
advertisement
8/8
'बिग बॉस'च्या घरात येण्यापूर्वी प्रणितने आपले सर्वात मोठे स्वप्न पूर्ण केले. त्याने स्वतःच्या कमाईतून आपल्या आई-वडिलांसाठी मुंबईतच स्वतःचे घर विकत घेतले! 'बिग बॉस'मध्ये बोलताना त्याने सांगितले की, आईला मुंबईत घर नको होते, पण त्यांना स्वतःजवळ ठेवण्यासाठी त्याने मुंबईतच घर घेतले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Pranit More: कंडक्टरचा मुलगा ते 'बिग बॉस'चा फायनलिस्ट! प्रणित मोरेने देशभरात उंचावली महाराष्ट्राची मान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल