Sonali Kulkarni : फक्त दोनच डायलॉग अन्... संजय दत्तसोबतचा बेडरूम सीन, घाबरली होती सोनाली कुलकर्णी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sonali Kulkarni on Sanjay Sutt Bedroom Scene : संजय दत्तबरोबर बेडरूम सीन करताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रचंड घाबरली होती. सेटवर नेमकं काय झालं होतं?
advertisement
1/9

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने अनेक मराठी तसेच हिंदी सिनेमांत काम केलं आहे. साधी सोज्वळ, बिनधास्त अशा अनेक भूमिकेत ती दिसली आहे. काही महिन्यांआधी आलेल्या एका मराठी सिनेमात ती अभिनेता स्वप्निल जोशीबरोबर रोमान्स करताना दिसली होती ज्यानंतर प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
advertisement
2/9
पण तुम्हाला माहिती आहे का अनेक वर्षांआधी सोनाली अभिनेता संजय दत्तबरोबर बेडरूम सीन केला होता. पण हा सीन करताना सोनाली प्रचंड घाबरली होती. हेअर स्टायलिस्टचे प्रश्न ऐकून सोनालीला काही सुचेनासं झालं होतं.
advertisement
3/9
सोनाली आणि संजय दत्त यांनी विधु विनोद चोप्रा यांच्या मिशन कश्मीर सिनेमांत एकत्र काम केलं होतं. या सिनेमात एक बेडरूम सीन होता. तो करण्यासाठी सोनाली प्रचंड घाबरली होती. सोनाली तेव्हा इंडस्ट्रीत फार नवखी होती.
advertisement
4/9
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना सोनालीने सांगितलं, "सिनेमात एक सीन होता ज्याला सगळे बेडरूम सीन म्हणत होते. त्याला असं नाव देण्याची गरज नव्हती पण सगळे तसंच म्हणत होते."
advertisement
5/9
"मी कॉन्च्युम चेंज केल्यानंतर हेअर ड्रेसरने मला विचारलं ती तू वॅक्सिंग केलंस का. मी शॉक झाले. केलं आहे कदाचित असं म्हणाले. मी इतकी घाबरले की मला कॉन्स्ट्रेशन करणं जमत नव्हतं. माझा ओठ कापत होते, हात पाय थरथरत होते."
advertisement
6/9
सोनालीने पुढे सांगितलं, "फिल्मच्या त्या सीनमध्ये संजय दत्त मला म्हणतो की, आज अल्ताफने मला अब्बा म्हटलं. त्यावर सोनाली म्हणते, तो आधी मला अम्मी म्हणाला. या संवादानंतर पती-पत्नी एकमेकांना मिठी मारतात आणि तो सीन संपतो."
advertisement
7/9
सोनालीनं सांगितलं, "एवढाच सीन होता पण मी इतकी नर्वस झाले होते की कधी गाउन सरळ करू, कधी उठू, कधी बसू काही कळत नव्हते. मला असं अस्वस्थ पाहून संजय दत्तने मला बोलावलं आणि म्हणाला, यात किसही नाहीये, फक्त दोन डायलॉग आणि मिठी मारायची आहे."
advertisement
8/9
"संजय मला म्हणाला की, मीही नर्वस आहे. जर तू सुद्धा अशी नर्वस असशील तर बेटा हा सीन नीट होणार नाही. त्यामुळे रिलॅक्स राहा."
advertisement
9/9
संजय दत्तसोबतचा हा किस्सा सांगताना तो खूप क्यूट आहे असंही सोनाली म्हणाली. दोघांनी 'मिशन काश्मीर'बरोबरच फरहान अख्तरच्या 'दिल चाहता हैं' सिनेमातही एकत्र काम केलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sonali Kulkarni : फक्त दोनच डायलॉग अन्... संजय दत्तसोबतचा बेडरूम सीन, घाबरली होती सोनाली कुलकर्णी