TRENDING:

Sridevi : मराठमोळ्या गायिकेच्या 'या' दोन गाण्यांची श्रीदेवीने केलेली चोरी; 36 वर्षांनंतर सिंगरचा खुलासा

Last Updated:
Sridevi : हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या श्रीदेवी यांनी एका मराळमोळ्या गायिकेच्या दोन गाण्यांची चोरी केली होती.
advertisement
1/7
मराठमोळ्या गायिकेच्या 'या' दोन गाण्यांची श्रीदेवीने केलेली चोरी
बॉलिवूडची चांदनी अर्थात श्रीदेवी यांचा 'चांदनी' हा चित्रपट 1989 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात श्रीदेवी, ऋषि कपूर आणि विनोद खन्ना मुख्य भूमिकेत होते. यश चोप्रा यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. 'चांदनी' हा एक म्युझिकल रोमँटिक चित्रपट होता. हा चित्रपट रिलीज झाला आणि श्रीदेवी इंडस्ट्रीची चांदनी बनली.
advertisement
2/7
'चांदनी' या चित्रपटातील गाणीदेखील सुपरहिट ठरली होती. लता मंगेशकर, पामेला चोप्रा, विनोद राठोड यांनी या चित्रपटासाठी गाणी गायली होती.
advertisement
3/7
'चांदनी' चित्रपटातील गाणं गाणारी खरंतर एक मराठमोळी गायिका होती. पण श्रीदेवींच्या आग्रहामुळे त्यांना गाता आलं नाही.
advertisement
4/7
मराळमोळ्या गायिका अनुपमा देशपांडे म्हणाल्या,'आगे आगे चले हम' या गाण्याचं डबिंग मी केलं होतं. त्यावेळी यश चोप्रा यांनी माझं कौतुक केलं होतं".
advertisement
5/7
अनुपमा देशपांडे म्हणाल्या,"रंग भरे बादल के' हे गाणंदेखील माझं होतं. कारण अशापद्धतीचं गाणं लता दीदींना गाता येणार नव्हतं. त्यामुळे मी आणि जॉलीने हसतखेळत हे गाणं गायलं. अखेर हे गाणं खूप चांगलं झालं. श्रीदेवीला हे गाणं पसंतीस उतरलं.
advertisement
6/7
अनुपमा देशपांडे पुढे म्हणाल्या,"आता हे गाणं मीच गाणार असा श्रीदेवींचा हट्ट होता. त्यामुळे श्रीदेवी यांना कोण नकार देणार? पण गाण्यात शेवटी 'चाँदणी' असे जे बोल आहेत तो आवाज माझाच आहे. चाँदणी तू मेरी चाँदणी हे एवढं मी गायलं होतं".
advertisement
7/7
अनुपमा देशपांडे यांच्या हातून दोन गाणी गेल्याचं यश चोप्रा यांना मात्र खूप वाईट वाटलं होतं. बॉलिवूड ठिकाणला दिलेल्या मुलाखतीत अनुपमा देशपांडे याबद्दल व्यक्त झाल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sridevi : मराठमोळ्या गायिकेच्या 'या' दोन गाण्यांची श्रीदेवीने केलेली चोरी; 36 वर्षांनंतर सिंगरचा खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल