मागील चार ते पाच वर्षांपासून नारायण चंद आलं शेती करतात. अद्रकीची लागवड दहा ते बारा जून रोजी साडेचार फुटांच्या बेडवर केली जाते. अद्रकीला लागवडीपूर्वी बेसल डोस दिला जातो. त्यामध्ये युरिया आणि डीएपीचा समावेश असतो. त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याची किट वापरली जाते. निंबोळी पेंड, कार्बोफेरम आणि हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी बाजारात उपलब्ध असलेले ट्रायकोडर्मासारखे जैविक वापरले जातात.
advertisement
स्वयंपाक घरात पॅकिंगमधून येणारा गहू आटा बनतो तरी कसा? पाहा A टू Z प्रक्रिया Video
अद्रकीवर सुरुवातीच्या स्टेजमध्ये आळी आणि करपा असे रोग येतात. या रोगांना अँटिबायोटिक किंवा बुरशीनाशक घेऊन नियंत्रण मिळवता येते. अद्रकीमध्ये सड रोग हा एक महत्त्वाचा रोग आहे. त्यासाठी ते जैविक ट्रायकोडर्मा आणि कृषी विद्यापीठाने सल्ला दिलेली औषधे वापरतात.
रामेश्वर चंद यांनी दोन वर्षांपूर्वी घाणेवाडी जलाशयातील गाळ आपल्या शेतामध्ये टाकला होता. याच शेतामध्ये त्यांनी दोन एकर क्षेत्रात जून महिन्यात अद्रकीची लागवड केली. केवळ दोनच एकरात 550 क्विंटल एवढे विक्रमी उत्पादन त्यांना मिळाले आहे. त्यांच्या अद्रकीला तीन हजार पाचशे रुपये एवढा दर मिळाला. केवळ दोन एकरामध्ये 15 ते 16 लाखांचे उत्पन्न त्यांच्या हाती आले आहे.
शेतकऱ्यांनी पारंपरिक पिके घेऊन नैराश्यात जाण्यापेक्षा नवनवीन पिके आणि प्रयोग शेतीमध्ये करावेत. शेतीतील उत्पन्न वाढवावे, असे आवाहन नारायण चंद हे उच्चशिक्षित तरुणांना करतात.