TRENDING:

'देशाशी इमान राखा', इराणच्या खामेनेईंसाठी रडणाऱ्या फरहानावर हिना खानचा नवरा भडकला; अभिनेत्रीला चांगलंच झापलं

Last Updated:
Rocky Jaiswal Slammed Farhana Bhatt: 'बिग बॉस १९' फेम अभिनेत्री फरहाना भट्ट हिने खामेनेईंच्या मृत्यूबद्दल व्यक्त केलेला शोक सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावरून अभिनेत्री हिना खानचा पती रॉकी जयस्वालने तिला चांगलंच झापलं आहे.
advertisement
1/9
इराणच्या खामेनेईंसाठी रडणाऱ्या फरहानावर हिना खानचा नवरा भडकला
इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर सध्या जगभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, भारतात या मुद्द्यावरून एका वेगळ्याच वादाला तोंड फुटलं आहे.
advertisement
2/9
'बिग बॉस १९' फेम अभिनेत्री फरहाना भट्ट हिने खामेनेईंच्या मृत्यूबद्दल व्यक्त केलेला शोक सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावरून आता अभिनेत्री हिना खानचा जोडीदार रॉकी जयस्वाल याने फरहानाचं नाव न घेता तिला चांगलंच झापलं आहे.
advertisement
3/9
"ज्या देशात राहता, आधी तिथल्या लोकांसाठी रडायला शिका," अशा कडक शब्दांत रॉकीने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
4/9
काही दिवसांपूर्वी फरहाना भट्टने एका मुलाखतीत खामेनेईंच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करताना म्हटलं होतं की, "खामेनेई हे अनेकांसाठी मसीहा होते. त्यांच्या जाण्याने सर्व काश्मिरी लोक धक्क्यात आहेत. तुम्हाला खरं वाटणार नाही, पण सेहरीनंतर मी अजिबात झोपू शकले नाही. नमाज पढताना मला खूप रडू आलं."
advertisement
5/9
फरहानाचा हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं, पण रॉकी जयस्वालच्या पोस्टने या वादात मोठी ठिणगी टाकली आहे. रॉकी जयस्वालने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक लांबलचक पोस्ट शेअर करत फरहानाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
advertisement
6/9
तो म्हणाला, "तुम्ही खाजगीत कोणासाठीही शोक करा, मला काही देणंघेणं नाही. पण जेव्हा तुम्ही सार्वजनिकपणे एखाद्या हुकूमशहाचं उदात्तीकरण करता, तेव्हा टीकेसाठी तयार राहा. मी अशा लोकांना कधीच भारतीय सैनिकांसाठी किंवा देशातील दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी रडताना पाहिलं नाही. या देशात लोकशाही आहे म्हणून तुम्ही सुरक्षित आहात आणि इथे राहून परदेशी हुकूमशहाबद्दल प्रेम व्यक्त करता? हे देशाशी गद्दारी करण्यासारखं आहे."
advertisement
7/9
रॉकीने पुढे ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा संदर्भ देत म्हटलं की, ज्या महान व्यक्तींनी देशासाठी आयुष्य वेचलं त्यांच्याबद्दल कधी इतकं प्रेम दाखवलं नाही आणि जे लोक नेहमीच आपल्या देशाच्या विरोधात उभे राहिले, त्यांच्यासाठी हे प्रेम कशासाठी?
advertisement
8/9
रॉकीच्या या रोखठोक विधानामुळे सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. एका बाजूला लोक रॉकीचं समर्थन करत आहेत की 'राष्ट्रहित सर्वोपरि' असायला हवं. तर दुसरीकडे, काही लोक याला वैयक्तिक भावनांचा प्रश्न म्हणत आहेत.
advertisement
9/9
इराणमध्ये खामेनेईंच्या मृत्यूनंतर जिथे काही ठिकाणी फटाके फोडून जल्लोष केला गेला, तिथे भारतातील लखनौ, हैदराबाद आणि काश्मीरसारख्या भागांत काही गटांनी निषेध व्यक्त केला. फरहानाने या भावनेला साद घातली असली तरी, रॉकीच्या मते हे 'चुकीच्या जागी दाखवलेलं प्रेम' आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'देशाशी इमान राखा', इराणच्या खामेनेईंसाठी रडणाऱ्या फरहानावर हिना खानचा नवरा भडकला; अभिनेत्रीला चांगलंच झापलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल