TRENDING:

Marathi Actress : 'हिला अक्कल आहे का', मराठी अभिनेत्रीला सगळे हिणवायचे, TV ची फेमस व्हिलन बाथरुममध्ये रडायची

Last Updated:
Marathi Actress Struggle : मराठी टेलिव्हिजनवर नायिकांना रडणारी व्हिलन तिच्या स्ट्रगल काळात बाथरुममध्ये जाऊन रडायची. स्ट्रगल काळातील दिवस आठवून तिला अश्रू अनावर झाले.
advertisement
1/8
'हिला अक्कल आहे का', मराठी अभिनेत्रीला सगळे हिणवायचे, ती बाथरुममध्ये रडायची
मराठी टेलिव्हिजनवरची प्रसिद्ध अभिनेत्री माधवी निमकर. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेती तिने साकारलेली शालिनी ही भूमिका खूप लोकप्रिय झाली. शालिनीमुळे माधवीला एक वेगळी ओळख मिळाली. माधवीनं सध्या छोट्या पडद्यापासून दूर आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिने तिच्या स्ट्रगल काळातील आठवणी सांगितल्या.
advertisement
2/8
मज्जा पिंकला दिलेल्या मुलाखतीत माधवीला तिचा जुना फोटो दाखवण्यात आला. तो फोटो पाहून माधवी भावुक झाली. ती म्हणाली, "मी खूप मिस करते. ही माधवी तिच्याकडे आधी काही नव्हतं. पण तरी ती खुश होती. माहिती होतं की आपली परिस्थिती फार चांगली नाहीये."
advertisement
3/8
"तिची कधीच कोणत्याच गोष्टीतच तक्रार कधीच नव्हती, आई-बाबांकडेही नाही. मला हे पाहिजे ते पाहिजे. एकच साम्य तिच्यात आणि माझ्यामध्ये आहे ते म्हणजे आजही माझी कोणाकडून काहीच अपेक्षा नाहीये. रुबेनकडूनही नाही."
advertisement
4/8
"हे दिवस इतके सुंदर असतात. देवाने कधी चुकून विचारलं की तुला काय हवंय तर मी सांगेन की हे दिवस परत दे. कारण जे कळत नसतं जग बघितलेलं नसतं. नको हे जग बघायला. खूप विचित्र जग आहे हे. माझ्यासाठी नको म्हणते, मी खूप बावळट होते. ते शहाणपण गाठायला चाळीशी गाठायला लागली."
advertisement
5/8
स्ट्रगल काळातील दिवस सांगताना माधवी म्हणाली, "मी गावातून आले. मला सगळ्यांनी हिणवलं. हिला काय कळतंय. हिला अक्कल आहे का, मूर्ख आहे ही. हे सगळं मी ऐकत आलीये. माझ्यासाठी हा टास्क होता की माधवी कोणाला उत्तर देऊ नको, स्वत: ला दे."
advertisement
6/8
"माझ्यात एक मायनस पॉइंट होता, विसरभोळेपणा. थोड्या प्रमाणात माणसात असतो. त्याच्यावरून मी ऐकलंय. पण मी कोणालाच यावरुन उत्तर दिलं नाहीये. मी बाथरूममध्ये जाऊन रडायचे."
advertisement
7/8
माधवी पुढे म्हणाली, "मी ते चॅलेंज म्हणून घेतलं. की माधवी कामच असं कर की सगळ्यांची तोंड बंद होतील. माझं टार्गेट असं कधीच नव्हतं की, मी श्रीमंत असायला पाहिजे, बीएमडब्ल्यू असायला पाहिजे हे माझं स्वप्न कधीच नव्हतं. ते नशीबात असेल तर देव तुम्हाला देईल."
advertisement
8/8
"तुमच्या बायोडेटामध्ये तुमच्याकडे गाडी किती आहे घर किती यापेक्षा तुम्ही काम किती केलीत ते बायोडेटामध्ये असू देत ती माझी श्रीमंती आहे. माझा फोकस पैसा कधीच नव्हता. काम करतोय म्हणजे पैसा आलाच."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Marathi Actress : 'हिला अक्कल आहे का', मराठी अभिनेत्रीला सगळे हिणवायचे, TV ची फेमस व्हिलन बाथरुममध्ये रडायची
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल