TRENDING:

सासू-सासऱ्यांना खोटं सांगून 'तारक मेहता...'मध्ये काम करत होती अभिनेत्री, 'असा' झाला भांडाफोड; पुढे जे झालं...

Last Updated:
TMKOC : गेल्या १७ वर्षांपासून टीव्हीवर कॉमेडीचा धुमाकूळ घालत असलेला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो आता बहुतांश प्रेक्षकांच्या घराचा एक अविभाज्य भाग बनला आहे.
advertisement
1/9
सासू-सासऱ्यांना खोटं सांगून 'तारक मेहता...'मध्ये काम करत होती अभिनेत्री
मुंबई: गेल्या १७ वर्षांपासून टीव्हीवर कॉमेडीचा धुमाकूळ घालत असलेला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो आता बहुतांश प्रेक्षकांच्या घराचा एक अविभाज्य भाग बनला आहे.
advertisement
2/9
या शोमध्ये अनेक कलाकारांनी एन्ट्री घेतली आणि काही जण सोडूनही गेले, पण शोची लोकप्रियता आजही तसूभरही कमी झाली नाही.
advertisement
3/9
सध्या अंजली भाभीची भूमिका साकारणाऱ्या सुनैना फौजदारनेही या लोकप्रियतेमुळे आलेल्या एका वेगळ्या अनुभवाचा खुलासा केला आहे.
advertisement
4/9
जेव्हा सुनैना फौजदारला अंजली भाभीच्या भूमिकेची ऑफर मिळाली, तेव्हा तिने ही गोष्ट पहिल्या महिनाभर गुप्त ठेवली होती. विशेषतः सासरच्या मंडळींना तिने याबद्दल काहीही सांगितलं नव्हतं.
advertisement
5/9
हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत सुनैनाने सांगितलं, “मी हा शो मिळाल्याचं कोणालाच सांगितलं नाही. जेव्हा शोचं शूटिंग सुरू झालं, तेव्हा पहिले काही दिवस माझे सासरचे लोक मला विचारायचे की 'तू कुठे जाते?' मी त्यांना सांगायचे, 'मी एका शोच्या शोधात आहे आणि मी लूक टेस्टसाठी जात आहे.'”
advertisement
6/9
सुनैनाने हे सिक्रेट का ठेवलं, याचं कारणही सांगितलं. ती म्हणाली, “‘तारक मेहता’ची क्रेझ तेव्हाही खूप होती. मी विचार केला की, आधी हा एपिसोड प्रसारित होऊ द्या.”
advertisement
7/9
आणि झालंही तसंच! जेव्हा तिच्या सासरच्या मंडळींनी टीव्हीवर हा शो पाहिला, तेव्हा ते एकदम शॉक झाले. “माझ्या सासरच्यांनी जेव्हा शो पाहिला, तेव्हा ते म्हणाले, 'अरे! आम्ही हे पाहिलं आहे. तो माणूस तिथे उभा असतो, तो इथे राहतो.' त्यांना या शोबद्दल खूप काही आधीच माहीत होतं आणि ते खूप उत्साहित झाले होते!”
advertisement
8/9
सुनैना २०२० मध्ये या शोमध्ये सामील झाली. तिने नेहा मेहताची जागा घेतली होती, त्यामुळे लोक तिची तुलना करतील अशी भीती तिला वाटत होती. मात्र, तसं न झाल्यामुळे तिने आनंद व्यक्त केला.
advertisement
9/9
ती म्हणाली, “हा शो इतक्या वर्षांपासून लोकांच्या मनात आहे, त्यामुळे मी त्याचा भाग आहे, याचा मला अभिमान आहे. मला नंतर सामील होऊनही खूप प्रेम मिळालं, हे माझं भाग्य आहे.”
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सासू-सासऱ्यांना खोटं सांगून 'तारक मेहता...'मध्ये काम करत होती अभिनेत्री, 'असा' झाला भांडाफोड; पुढे जे झालं...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल