अभिनेत्याच्या कुरळ्या केसांवर फिदा! काजोलची बहीण झाली गोवारीकरांची सून, कॉलेजवाली Love Story
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
'लगान', 'स्वदेस', 'पानिपत' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी काजोलच्या बहिणीशी लग्न केले आहे.
advertisement
1/8

‘लगान’, ‘स्वदेस’, ‘पानिपत’, ‘जोधा अकबर’, ‘मोहेंजो दारो’ यांसारखे ऐतिहासिक व सामाजिक विषय हाताळणारा यशस्वी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा आज १५ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे.
advertisement
2/8
हिंदी सिनेसृष्टीत प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून ओळख असलेल्या आशुतोषने अभिनय क्षेत्रातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. विशेष म्हणजे, त्याने काजोलच्या बहिणीशी लग्न केलं आहे.
advertisement
3/8
आशुतोष आणि त्यांची पत्नी सुनीता मुखर्जी यांची ओळख कॉलेजमध्ये झाली. दोघंही मिठीबाई कॉलेजमध्ये शिकत होते. सुनीता त्या काळात मॉडेलिंग करत होत्या आणि अनेक प्रसिद्ध ब्रँड्ससाठी काम करत होत्या. आशुतोष आपल्या मोठ्या व कुरळ्या केसांमुळे गटात नेहमी वेगळा वाटायचा. कॉलेजमध्ये तो विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असे.
advertisement
4/8
या ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. त्या काळात आशुतोष हिंदी दूरदर्शनवरील ‘सर्कस’, ‘इंद्रधनुष्य’, ‘कच्ची धूप’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये झळकत होता. त्याचवेळी सुनीता मॉडेलिंगमध्ये यशस्वी वाटचाल करत होती. मात्र, दोघांची क्षेत्रं जवळची असल्याने त्यांच्यात घट्ट मैत्री निर्माण झाली आणि पुढे त्याच मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं.
advertisement
5/8
यावेळी आशुतोषला उर्मिला मातोंडकर, करण जोहर, शाहरुख खान यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळत होती. त्याचा अभिनय आणि दिग्दर्शनाचा प्रवास सुरूच होता. या सगळ्यातच आशुतोष आणि सुनीता यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गोवारीकर आणि मुखर्जी कुटुंब एकमेकांशी कायमचे जोडले गेले.
advertisement
6/8
सुनीता मुखर्जीचे वडिल देब मुखर्जी हे काजोलचे काका आहे. म्हणजेच काजोल आणि सुनिता या चुलत बहिणी आहेत.
advertisement
7/8
लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली – कोणार्क आणि विश्वांग. सुनीताने मॉडेलिंग सोडून निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आणि ‘आशुतोष गोवारीकर प्रॉडक्शन हाऊस’ सुरू करण्यात मोलाची भूमिका बजावली. या बॅनरखाली ‘स्वदेस’, ‘जोधा अकबर’, ‘पानिपत’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती झाली.
advertisement
8/8
आशुतोष गोवारीकर आणि सुनीता यांची प्रेमकथा आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. एकमेकांवर निस्सीम प्रेम, करिअरमध्ये उत्तम समतोल आणि कुटुंबाला दिलेला महत्त्वपूर्ण वेळ यामुळे हे जोडपं बॉलिवूडमधील एक आदर्श कपल मानलं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अभिनेत्याच्या कुरळ्या केसांवर फिदा! काजोलची बहीण झाली गोवारीकरांची सून, कॉलेजवाली Love Story