TRENDING:

Dharmendra: धर्मेंद्र यांच्या फॅन्ससाठी सनी-बॉबी देओलचं खास गिफ्ट, 'या' दिवशी सर्वांसाठी उघडणार 150 कोटींच्या फार्महाऊसचे दार!

Last Updated:
Dharmendra 90th Birth Anniversary: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची येत्या ८ डिसेंबर रोजी ९० वी जयंती आहे. या खास दिवशी देओल बंधूंनी धर्मेंद्र यांच्या चाहत्यांसाठी खास प्लॅन तयार केला आहे.
advertisement
1/10
फॅन्ससाठी सनी-बॉबी देओल 'या' दिवशी उघडणार 150 कोटींच्या फार्महाऊसचे दार!
मुंबई: बॉलिवूडचे 'ही-मॅन' आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. या सुपरस्टारची येत्या ८ डिसेंबर रोजी ९० वी जयंती आहे.
advertisement
2/10
या खास दिवशी वडील धर्मेंद्र यांच्या आठवणींचा आणि वारशाचा सन्मान करण्यासाठी त्यांचे दोन्ही सुपरस्टार मुलगे सनी देओल आणि बॉबी देओल यांनी एक अत्यंत भावनिक आणि खास प्लॅन तयार केला आहे. विशेष म्हणजे, या सोहळ्यात चाहतेही सहभागी होऊ शकणार आहेत.
advertisement
3/10
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर संपूर्ण देओल कुटुंब अत्यंत दुःखात आहे. नुकतेच कुटुंबाने धर्मेंद्र यांच्या अस्थींचे हरिद्वारमध्ये विसर्जन करून काशी येथे पूजा केली. आता ८ डिसेंबर रोजी त्यांची ९० वी जयंती आहे.
advertisement
4/10
हिंदुस्थान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, सनी आणि बॉबी देओल यांनी वडिलांची ९० वी जयंती त्यांच्या वारशाला समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी धर्मेंद्र यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्या आवडत्या फार्म हाऊसवर एकत्र जमणार आहेत. हे फार्म हाऊस त्यांच्या साधेपणाचे आणि निसर्गावरील प्रेमाचे प्रतीक होते.
advertisement
5/10
या सोहळ्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे, देओल बंधूंनी धर्मेंद्र यांच्या चाहत्यांसाठीही फार्म हाऊसचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
6/10
कुटुंबातील एका जवळच्या सूत्राने सांगितले की, "सनी आणि बॉबी जेव्हा वडिलांच्या आठवणींना सन्मान देण्यासाठी फार्म हाऊसवर जाण्याचे नियोजन करत होते, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की अनेक चाहत्यांना आपल्या आवडत्या अभिनेत्याचे एक अंतिम दर्शन व्हावे, अशी तीव्र इच्छा आहे."
advertisement
7/10
म्हणूनच, जे चाहते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली देण्यासाठी आणि कुटुंबाला भेटण्यासाठी येऊ इच्छितात, त्यांच्यासाठी फार्म हाऊसचे दरवाजे खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
8/10
हा सोहळा कोणताही फॅन इव्हेंट नसून, वडिलांच्या आठवणींना आदरांजली वाहण्याचा आणि त्यांच्या साध्या राहणीचा सन्मान करण्याचा क्षण असेल.
advertisement
9/10
फार्म हाऊसपर्यंत पोहोचणे थोडे अवघड असल्यामुळे, चाहत्यांच्या सोयीसाठी प्रवासाच्या व्यवस्थेवर कुटुंब विचार करत आहे. सध्या या खास दिवसाची तयारी सुरू असून, लवकरच याबाबत अधिक माहिती जाहीर केली जाईल.
advertisement
10/10
धर्मेंद्र यांच्या दोन्ही पत्नी प्रकाश कौर आणि हेमा मालिनी यांच्यासह सर्व मुलांनी एकत्र येत ८ डिसेंबरचा हा भावनिक क्षण स्मृती आणि सन्मानाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dharmendra: धर्मेंद्र यांच्या फॅन्ससाठी सनी-बॉबी देओलचं खास गिफ्ट, 'या' दिवशी सर्वांसाठी उघडणार 150 कोटींच्या फार्महाऊसचे दार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल