Sunny Deol : वॉशरूमला जाऊन येतो सांगून गायब व्हायचा सनी देओल; जायचा तरी कुठे?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Sunny Deol : 'चालबाज'मध्ये सनी देओल आणि श्रीदेवी यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगलीच कमाई केली. पण या बहुचर्चित चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सनी देओल वॉशरूमला जाऊन सांगून अनेकदा गायब होत असे.
advertisement
1/7

सनी देओल आणि श्रीदेवी यांच्या 'चालबाज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. आजही या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळते. पंकज पाराशर यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती.
advertisement
2/7
पंकज यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत खुलासा केला होता की, सनी देओलला त्यावेळी त्यावेळची लेडी सुपरस्टार श्रीदेवीसोबत डान्स करायचा होता. श्रीदेवीसोबत डान्स करायची सनी देओलला भीती वाटली आणि वॉशरूमला जाऊन येतो, असं सांगून तब्बल दोन तास ते गायब होते.
advertisement
3/7
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत पंकज म्हणाले होते,"चालबाज' चित्रपटातील 'ना जाने कहां से आई है' या गाण्याचं शूटिंग करायला आमच्याकडे फक्त तीन दिवस होते. सरोज खान या गाण्याचं कोरिओग्राफी करत होते.
advertisement
4/7
श्रीदेवीला 'ना जाने कहां से आई है' या गाण्यात काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यामुळे सरोजने सनी देओल यांना डान्स करायला भाग पाडलं.
advertisement
5/7
पंकज पुढे म्हणाले,"आमच्याकडे फक्त तीन दिवस असल्याने आम्ही पुन्हा शूटिंग सुरू केलं. सनी देओलच्या डान्सची वेळ आली आणि तो गायबच झाला. 2 तास त्याच्यासोबत काहीही संपर्क झाला नाही".
advertisement
6/7
सनी देओल गायब झाल्याने श्रीदेवीदेखील वारंवार त्यांच्याबद्दल विचारत होत्या. अखेर सनी देओल सेटवर परतले आणि त्यांनी शूटिंग केलं. पण आजपर्यंत ते दोन तास सनी देओल कुठे होते हे कोणालाही माहिती नाही.
advertisement
7/7
सनी देओलने अनेक बॉलिवूड चित्रपटांत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आता त्यांच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sunny Deol : वॉशरूमला जाऊन येतो सांगून गायब व्हायचा सनी देओल; जायचा तरी कुठे?