TRENDING:

सूरज चव्हाणने शब्द फिरवला! नव्या घराला 'बिग बॉस' नाही दिलं हे नाव, सगळेच झाले शॉक

Last Updated:
Surja Chavan House Name : सूरज चव्हाणच्या नव्या घराचं नाव वाचलंत! नवीन घर तयार होताच सूरज चव्हाणने त्याचा शब्द बदलला आहे. त्याच्या घराचं नाव वाचून सगळेच शॉक झालेत.
advertisement
1/8
सूरज चव्हाणने शब्द फिरवला! नव्या घराला 'बिग बॉस' नाही दिलं हे नाव, सगळेच शॉक
बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. सूरज चव्हाणने नोव्हेंबर महिन्यात लग्न केलं. सूरजच्या लग्नाची देखील खूप चर्चा झाली. सूरजने त्याच्या मामाची मुलगी संजनासोबत लग्नगाठ बांधली.
advertisement
2/8
लग्नासोबत सूरजची दोन स्वप्न पूर्ण झाली. आधी त्याचं करिअर झालं मग लग्न आणि त्याआधी त्याचं स्वप्नातील घर देखील तयार झालं. बिग बॉस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीने सूरज चव्हाणचं स्वप्नातील घर बनून तयार झालं
advertisement
3/8
घर झाल्यानंतर मात्र सूरज चव्हाणने त्याचा शब्द फिरवला आहे. सूरज चव्हाणच्या घराचं नाव वाचून सगळेच शॉक झालेत.
advertisement
4/8
बारामतीमध्ये मोढवे या एका छोट्याशा गावात झोपडीत दिवस काढलेल्या सूरज चव्हाणने कायम मोठ्या घराचं स्वप्न पाहिलं होतं. बिग बॉसच्या घरात असताना देखील त्यानं त्याला त्याचं घर बांधायचं आहे असं सांगितलं होतं.
advertisement
5/8
बिग बॉसमधून बाहेर गेल्यानंतर मी माझं घर बांधणार आणि त्या घराला बिग बॉस असं नाव देणार असं सूरज चव्हाणाला होता. बिग बॉस माझं देव आहेत असंही सूरज म्हणाला होता. पण घर बांधल्यानंतर मात्र सूरजने त्याचा शब्द फिरवला.
advertisement
6/8
सूरज चव्हाणने त्याच्या घराला बिग बॉस असं नाव दिलेलं नाही. अजित दादा किंवा आणखी कोणाचंही नाव दिलेल्या नाही. त्याच्या घराच्या नेमप्लेटचा फोटो समोर आला आहे. त्यावरचं नाव वाचून सगळ्यांना धक्का बसलाय.
advertisement
7/8
सूरज चव्हाणने त्याच्या घराला 'आई आप्पांची पुण्याई' असं नाव दिलं आहे. त्याआधी श्री.सुरज चव्हाण आणि सौ. संजना चव्हाण अशी दोघांची नावं लिहिली आहेत.
advertisement
8/8
सूरज चव्हाणच्या घराला त्याने बिग बॉसचं नाव देता त्याच्या आई-वडिलांचं नाव दिलं आहे. त्याच्या आई-वडिलांचं त्याच्या आयुष्यात असलेलं स्थान आणि प्रेम त्याने नेहमीच व्यक्त केलं आहे. म्हणूनच सूरजने त्याच्या नव्या घराला त्याच्या आई वडिलांचं नाव दिलं आहे. घराला आई-वडिलांचं नाव देत त्याने त्यांना एकप्रकारे श्रद्धांजली दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सूरज चव्हाणने शब्द फिरवला! नव्या घराला 'बिग बॉस' नाही दिलं हे नाव, सगळेच झाले शॉक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल