TRENDING:

अहो I LOVE YOU! लग्नाच्या 20 दिवसांत सूरजला बायकोने केलं प्रपोज, 'गुलिगत किंग'चा आनंद गगनात मावेना

Last Updated:
Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाण काही दिवसांपूर्वीच संजना गोफणेसोबत विवाहबंधनात अडकला आहे. आता लग्नानंतर संजनाने सूरजला प्रपोज केल्याचं पाहायला मिळत आहे.
advertisement
1/7
अहो I LOVE YOU! लग्नाच्या 20 दिवसांत सूरजला बायकोने केलं प्रपोज
सूरज चव्हाण आणि संजना गोफणे 29 नोव्हेंबर 2025 रोजी विवाहबंधनात अडकले. त्यांच्या विवाहसोहळ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. रील स्टार ते 'बिग बॉस मराठी'चा विजेता ठरलेल्या सूरजचा जेजूरी-सासवड याठिकाणी लग्नसोहळा पार पडला.
advertisement
2/7
सूरज चव्हाणने लग्नानंतर बायकोसोबतचे फोटो शेअर करत खास कॅप्शन लिहिलं होतं,"जी होती मनात तीच बायको केली, Love Marriage Succesful".
advertisement
3/7
सूरज चव्हाणने लव्ह मॅरेज केलं आहे. सूरजची बायको संजना ही त्याच्या चुलत मामाची मुलगी आहे. सूरज आणि संजना एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. लहानपणी एकमेकांसोबत खेळता-खेळता त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पुढे दोघांच्या घरच्यांच्या संमतीने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
4/7
सूरज लग्नाआधी म्हणाला होता की, त्याने संजनाला कधीही प्रपोज केलेलं नाही. नकळत त्यांचे सूर जुळले. सूरजने आपल्या अदांनी, हटके स्टाईलने संजनाला भूरळ घातली आणि प्रेमात पाडलं होतं.
advertisement
5/7
सूरज आणि संजना यांच्या लग्नाला आता 20 दिवस झाले आहेत. लग्नाच्या 20 दिवसांनी संजनाने सूरजला प्रपोज केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांचा रोमँटिक क्यूट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
6/7
संजना सूरजला गुलाबाचं फुल देत प्रपोज करत म्हणतेय,"अहो I LOVE YOU". बायकोने प्रपोज केल्याचं पाहून सूरजला आनंद गगनात मावेनासा झालाय. सूरज संजनाला म्हणतोय,"आयुष्यात पहिल्यांदा मी एवढा खूश झालो आहे". त्यावर संजना म्हणते,"अहो हसू दे". यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे.
advertisement
7/7
सूरज आणि संजना यांच्या या व्हिडीओवर असेच नेहमी सुखी राहा, कोणत्याही परिस्थितीत एकमेकांची साथ द्या, एवढा खुश झाला की पलीकडे आभाळ पेटलं, गरिबीतून मोठा झालेला श्रीमंत माणूस, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. त्यांचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अहो I LOVE YOU! लग्नाच्या 20 दिवसांत सूरजला बायकोने केलं प्रपोज, 'गुलिगत किंग'चा आनंद गगनात मावेना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल