TRENDING:

Suraj Chavan Wedding guests : अशोक मामा, अक्षय कुमार ते अजित दादा, सूरज चव्हाणच्या लग्नाला कोण कोण येणार? पाहुण्यांची लिस्ट

Last Updated:
Suraj Chavan Wedding guests List : सूरज चव्हाणच्या लग्नासा काही तास उरले आहेत. राजकीय मंडळींपासून सेलिब्रेटींपर्यंत सूरज चव्हाणच्या लग्नाला कोण कोण हजेरी लावणार त्या पाहुण्यांची लिस्ट समोर आली आहे.
advertisement
1/8
अशोक मामा, अक्षय कुमार ते अजित दादा, सूरज चव्हाणच्या लग्नाला कोण कोण येणार?
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण त्याच्या नव्या आयुष्याची सुरुवात करतोय. सूरजच्या आयुष्याती दोन मोठ्या क्षणांचा आनंद तो साजरा करत आहे. नुकतंच त्याचं नवं आलिशान घर पूर्ण झालं. आज 29 नोव्हेंबर रोजी सूरज चव्हाण त्याच्या मामाची मुलगी संजना गोफणे हिच्याशी लग्न करतोय. त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात देखील झाली आहे.
advertisement
2/8
सूरज आणि संजनाचे प्री-वेडिंग फोटो, व्हिडीओ आणि लग्नपत्रिका सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड व्हायरल होत आहेत. सूरजचं लग्न हे ग्रँड होणार आहे यात काही शंका नाही. पण सूरजच्या लग्नाला नक्की कोण कोण उपस्थित राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
advertisement
3/8
सूरजच्या लग्नात महाराष्ट्रातील अनेक मान्यवर नेत्यांची उपस्थिती असणार आहे. सूरज चव्हाणच्या लग्नातील प्रमुख पाहुण्यांची यादीच समोर आली आहे. सूरजची लग्नपत्रिका व्हायरल झाली आहे त्यात लग्नाला येणाऱ्या राजकीय मंडळींपासून सेलिब्रेटींचीही नावे आहेत.
advertisement
4/8
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनित्रा अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार विजय बापू शिवतारे, संजय जगताप आणि अशोक टेकवडे हे नेते सूरजच्या आयुष्यातील या आनंदाच्या क्षणी उपस्थित राहणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
advertisement
5/8
या लग्नातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मनोरंजन विश्वातून अनेक सुपरस्टार्स देखील येणार आहे. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठमोठी नावं पाहुण्यांची नावं लिस्टमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
6/8
त्यात विशेष नाव म्हणजे बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार. अक्षयसोबतच मराठी इंडस्ट्रीमधील अनेक लोकप्रिय कलाकारांनीही सूरजच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. अभिनेते अशोक सराफ, रितेश देशमुख, वर्षा उसगांवकर, केदार शिंदे यांची खास उपस्थिती सूरजच्या लग्नात पाहायला मिळाली आहे.
advertisement
7/8
बिग बॉस मराठी सीझन पाचची संपूर्ण टीम सूरजच्या लग्नाला येणार आहे. ज्यात अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, आर्या जाधव, ईरिना, निक्की तांबोळी, घनश्याम दरोडे, अरबाज पटेल, निखिल दामले, धनंजय पवार, पुरुषोत्तमदादा पाटील, जान्हवी किल्लेकर, वैभव चव्हाण, संग्राम चौघुले, योगिता चव्हाण हे कलाकार उपस्थित राहाणार आहेत. तसंच चंदन कांबळे, उत्कर्ष शिंदे, कुणाल भगत यांचीही उपस्थिती असणार आहे.
advertisement
8/8
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव सूरज चव्हाणच्या लग्नाच्या पाहुण्यांमध्ये असलं तरी अजित पवार लग्नाला उपस्थित राहणार नसल्याचं बोललं जात आहे. अजित पवार यांच्या नियोजित दौऱ्यासाठी आज ते बीडमध्ये आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Suraj Chavan Wedding guests : अशोक मामा, अक्षय कुमार ते अजित दादा, सूरज चव्हाणच्या लग्नाला कोण कोण येणार? पाहुण्यांची लिस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल