सूरज चव्हाणच्या बायकोच्या हातावर झापुक झुपूक मेहेंदी, कुठे लिहिलंय नवऱ्याचं नाव, तुम्हाला दिसलं का?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Suraj Chavan Wedding Update : सूरज चव्हाण लवकरच विवाहबंधनात अडकणार असून आता त्याची होणारी बायको म्हणजेच संजयाच्या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
1/7

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सूरज त्याच्या मामाची मुलगी अर्थात संजना गोफणेसोबत लग्न करतोय. 29 नोव्हेंबर 2025 रोजी सासवड-जेजुरी याठिकाणी गुलिगत किंगचा थाटामाटाक लग्नसोहळा पार पडणार आहे.
advertisement
2/7
सूरजच्या घरी आता लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. संजनाच्या हातावर सूरजच्या नावाची मेहंदी रंगली आहे. नुकताच संजनाचा मेहंदीसोहळा पार पडला आहे. या मेहंदीसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
3/7
संजनाच्या मेहंदीवर 'सूरज-संजना' असं लिहिलेलं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे संजनाने तिच्या मेहंदीच्या डिजाइनमध्ये सूरजचा एक खास डायलॉग लिहिला आहे.
advertisement
4/7
सूरज चव्हाणचा 'झापुक-झुपूक' हा डायलॉग महाराष्ट्रभर गाजला. तसेच काही दिवसांपूर्वी केदार शिंदे दिग्दर्शित त्याचा 'झापुक-झुपूक' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे संजनानेही आपल्या लग्नाच्या मेहंदीमध्ये खास 'झापुक-झुपूक' लिहिलं आहे.
advertisement
5/7
सूरज चव्हाण आणि संजना गोफणे यांचं लव्हमॅरेज होणार आहे. संजना ही सूरजच्या चुलतमामांची मुलगी आहे. त्यामुळे सूरज आता 'गोफणे' परिवाराचा जावई होण्यास सज्ज आहे.
advertisement
6/7
सूरज चव्हाण आणि संजना गोफणे यांचा 29 नोव्हेंबर 2025 रोजी सासवड-जेजुरी येथे सायंकाळी 6 वाजून 11 मिनिटांच्या शुभमुहूर्तावर लग्न होणार आहे. तसेच आपल्या नव्या नवरीचं अर्थात लक्ष्मीचं सूरज थाटामाटात नव्या घरात स्वागत करणार आहे.
advertisement
7/7
सूरज चव्हाणच्या लग्नाला आता काहीच तास उरले आहेत. सूरजचा 29 नोव्हेंबरलाच साखरपुडा आणि हळदीचा कार्यक्रम पार पडणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम मोठ्या थाटात केले जाणार आहेत. आता सूरजच्या लग्नसोहळ्याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सूरज चव्हाणच्या बायकोच्या हातावर झापुक झुपूक मेहेंदी, कुठे लिहिलंय नवऱ्याचं नाव, तुम्हाला दिसलं का?