TRENDING:

संशयाच्या भोवऱ्यात अडकलेली गृहिणी, प्रत्येक सेकंदाला चक्रावणारा सस्पेन्स! राधिका आपटेची ही फिल्म OTT वर रिलीज

Last Updated:
Radhika Apte Film on OTT : राधिका आपटेचा एक बहुचर्चित चित्रपट अखेर ओटीटीवर रिलीज झाला आहे. डबल मर्डर आणि संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या एका गृहिणीची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
advertisement
1/7
राधिका आपटेची ही फिल्म OTT वर रिलीज, प्रत्येक सेकंदाला चक्रावणारा सस्पेन्स!
आपल्या दर्जेदार अभिनयाने सर्वांना थक्क करणाऱ्या राधिका आपटेचा एक बहुचर्चित चित्रपट अखेर ओटीटीवर रिलीज झाला आहे. हा रोमँटिक किंवा अॅक्शन, ड्रामा नसून एक भन्नाट केमिस्ट्री, सस्पेन्स आणि थ्रिलर या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा सिनेमा एकदा पाहायला घेतला की तुम्हाला शेवटपर्यंत पाहावाच लागेल.
advertisement
2/7
राधिका आपटेचा बहुप्रतीक्षित 'साली मोहब्बत' हा चित्रपट आता थेट ओटीटीवर रिलीज होणार आहे. 55 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला होता. पण आता घरबसल्या प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल. टिस्का चोप्रा यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. जिओ स्टुडिओज आणि मनीष मल्होत्राच्या स्टेज5 प्रॉडक्शनने या सिनेमाची निर्मिती केली आहे.
advertisement
3/7
'साली मोहब्बत' या चित्रपटाचं याआधी IFFI आणि शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हल (CSAFF) मध्ये कौतुक झालं होतं. आता ओटीटीवर धुमाकूळ घालण्यास हा चित्रपट सज्ज आहे. चित्रपटाची कथा एका छोट्या शहरात राहणाऱ्या स्मिता (राधिका आपटे) हिच्याभोवती फिरते.
advertisement
4/7
स्मिता ही शांत आयुष्य जगणारी असते. पण तिचं जीवन दिसतं तसं नसतं. अचानक शहरात झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर ती हादरून जाते. हळूहळू ती खोटेपणा, विश्वासघात आणि खुनांच्या जाळ्यात अडकत जाते. तपासादरम्यान हेही समोर येते की या प्रकरणात कोणीच दिसतं तसं नसतं.
advertisement
5/7
'साली मोहब्बत' या चित्रपटात तणाव, गुप्त नाती आणि जुन्या कारणांचे धागेदोरे समोर येत जातात. स्मिताला केवळ शहरातील वाढत्या गोंधळाला सामोरे जावे लागत नाही तर तिला स्वतःच्या मानसिक संघर्षांशीही झुंज द्यावी लागते. शेवटपर्यंत प्रेक्षकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की स्मिता फक्त एक निरीक्षक आहे की ती काहीतरी मोठं लपवते आहे? या चित्रपटात राधिका आपटे सोबत दिव्येंदू शर्मा, अनुराग कश्यप, अंशुमान पुष्कर, शरत सक्सेना आणि सौऱ्यसेनी मैत्री यांसारखे कलाकार दिसतील.
advertisement
6/7
कुशा कपिलाचा एक खास कॅमिओही 'साली मोहब्बत'मध्ये पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा दोन टाइमलाइनवर आधारित असल्याने सस्पेन्स आणखी वाढतो आणि प्रेक्षक शेवटपर्यंत कथेशी बांधलेले राहतात. 'साली मोहब्बत' हा सस्पेन्स, थ्रिलर आणि रहस्यकथांचे शौकीन असलेल्या प्रेक्षकांसाठी उत्तम पर्याय आहे. हा चित्रपट 12 डिसेंबरपासून ZEE5 वर स्ट्रीम होणार आहे.
advertisement
7/7
'साली मोहब्बत' चित्रपटाची कथा गृहिणी स्मिता (राधिका आपटे) हिची आहे. जी फुरस्तगड नावाच्या एका छोट्या गावातली आहे. तिचं आयुष्य सुरळीत चालू असतं, पण अचानक तिला आपल्या नवऱ्याच्या बेवफाईचा शोध लागतो. त्यानंतर ती हळूहळू खोटे, फसवणूक आणि खुनांच्या जाळ्यात अडकत जाते आणि इथूनच सुरू होतो खरी सस्पेन्सची खेळी. दोन टाइमलाइनमध्ये गुंफलेली ही कथा ज्या पद्धतीने मांडली आहे, ती खरंच पाहण्यासारखी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
संशयाच्या भोवऱ्यात अडकलेली गृहिणी, प्रत्येक सेकंदाला चक्रावणारा सस्पेन्स! राधिका आपटेची ही फिल्म OTT वर रिलीज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल