TRENDING:

कधी बिजनेसमॅन तर कधी क्रिकेटर, प्रसिद्ध अभिनेत्रीचा 11 वेळा ब्रेकअप; आता फिरतेय एक्स BF सोबत

Last Updated:
Sushmita Sen : सुष्मिता सेन आज आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. कधी क्रिकेटर, कधी उद्योगपतीला सुष्मिताने डेट केलं आहे. तब्बल 11 वेळा तिचं नातं तुटलं आहे.
advertisement
1/7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा 11 वेळा ब्रेकअप; आता फिरतेय एक्स BF सोबत
बॉलिवूडमध्ये अनेकवेळा प्रेम झालेले अनेक अभिनेते आहेत. पण त्यांनी कधीच लग्न केले नाही. यात अभिनेत्री सुष्मिता सेन हिचाही समावेश आहे. सुष्मिताने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. पण तिने कधीच लग्न केलं नाही. आपल्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे सुष्मिता जास्त चर्चेत राहिली.
advertisement
2/7
सुष्मिता सेनचं नाव देशातील अनेक मोठ्या व्यक्तींशी जोडले गेले. तब्बल 11 वेळा ती प्रेमात पडली. पण यातील एकही नातं तिला टिकवता आलं नाही. आज वयाच्या 49 व्या वर्षाही ती अविवाहित आहे. सुष्मिता सेनने क्रिकेटर, अभिनेता, दिग्दर्शक, खेळाडू, इतकंच नव्हे तर पाकिस्तानी खेळाडूंनाही डेट केलं होतं.
advertisement
3/7
सुष्मिता सेनने 1994 रोजी विश्वसुंदरी होत संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं. विश्वाससुंदरीचा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय महिला होती. आपल्या सौंदर्याने जगाचं लक्ष वेधून घेतल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
advertisement
4/7
सुष्मिता सेनने 'दस्तक' या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. महेश भट्ट या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुष्मिताची भेट सहाय्यक दिग्दर्शक विक्रम भट्टसोबत झाली. त्यावेळी विक्रम भट्टचं लग्न झालेलं होतं. पण तरीही ते सुष्मिताला डेट करत होते.
advertisement
5/7
सुष्मिता सेनचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय ठरलं आहे. अभिनेत्रीने तिचे सर्व निर्णय ठामपणे आणि निर्भीडपणे घेतले आहेत. जिथे इतर फिल्मी कलाकार आपलं वैयक्तिक आयुष्य लपवून ठेवतात, तिथे सुष्मिता मात्र आपल्या नातेसंबंधांबाबत नेहमीच लोकांसमोर खुलेपणाने भाष्य करत आली आहे.
advertisement
6/7
विक्रम भट्टसोबतच्या ब्रेकअपनंतर सुष्मिताचं नाव संजय नारंग, रणदीप हुड्डा, इम्तियाज खात्रीसह अनेकांसोबत जोडलं गेलं. हॉटमेलचे व्यवस्थापक सबीर भाटिया यांच्यासोबतही अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं. तसेच माजी पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अकरमलाही सुष्मिता डेट करत होती. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही.
advertisement
7/7
सुष्मिताची सर्वात आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे ललित मोदी यांच्यासोबतचं रिलेशन. ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतचे फोटो शेअर करून त्यांच्या आयुष्यातील नवीन सुरुवातीची घोषणा केली होती. मात्र काहीच दिवसांत त्यांनी अभिनेत्रीबरोबरचे फोटो डिलीट केले होते. त्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात अभिनेता रोहमन शॉलची एन्ट्री झाली. पण आता रोहमनसोबतही सुष्मिताचा ब्रेकअप झाला आहे. पण तरीही त्यांच्यातील मैत्री कायम आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कधी बिजनेसमॅन तर कधी क्रिकेटर, प्रसिद्ध अभिनेत्रीचा 11 वेळा ब्रेकअप; आता फिरतेय एक्स BF सोबत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल