TMKOC : 'तारक मेहता...' मध्ये बबितासारखी सुंदर वाइफ; खऱ्या आयुष्यात कोण आहे 'अय्यर'ची बायको
- Published by:Priya Lad
Last Updated:
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Iyer Wife : तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये मिस्टर कृष्णन अय्यरची भूमिका साकारणारा अभिनेता तनुज महाशब्देने एका मुलाखतीत त्याच्या खऱ्या आयुष्यातील लाइफ पार्टनरबाबत सांगितल होतं.
advertisement
1/5

बबिता आणि अय्यर तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमातील एक जोडी. बबितासारखी सुंदर बायको अय्यरला आहे, यावर जेठालालही सतत जलस होत असतो. पण अय्यरच्या खऱ्या आयुष्यात त्याची बायको कोण आहे, ती कशी दिसते, काय करते? माहिती आहे का?
advertisement
2/5
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये मिस्टर अय्यरची भूमिका करणारा अभिनेता म्हणजे तनुज महाशब्दे. अय्यर याच नावाने ओळखला जातो. एका मुलाखतीत त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगितलं होतं. ज्यात त्याने लग्न आणि पत्नीबाबतही खुलासा केला होता.
advertisement
3/5
तनुज महाशब्दे म्हणाला, "पडद्यावर माझी एक सुंदर पत्नी आहे, पण मी प्रत्यक्षात मी अजूनही अविवाहित आहे. खऱ्या आयुष्यात मी पोपटलाल आहे" 'तारक मेहता'मध्ये पोपटलाल अविवाहित दाखवण्यात आला आहे. ज्याची लग्नासाठी सतत धडपड सुरू असते.
advertisement
4/5
जेव्हा अभिनेत्याला विचारण्यात आलं की त्याच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी वेळ मिळत नाही का, तेव्हा तो म्हणाला, "असं असेलही, पण मला कारण माहित नाही"
advertisement
5/5
वयाच्या 44 व्या वर्षीही तनुज महाशब्दे अविवाहित आहे. लवकरच काहीतरी सकारात्मक घडेल, अशी आशाही त्याने ईटाइम्सशी बोलताना व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
TMKOC : 'तारक मेहता...' मध्ये बबितासारखी सुंदर वाइफ; खऱ्या आयुष्यात कोण आहे 'अय्यर'ची बायको