TRENDING:

'दयाबेन' आता कधीच परतणार नाही! सासरच्यांनी संपवलं दिशा वकानीचं करिअर, समोर ठेवल्या जहरी अटी, अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Last Updated:
Disha Vakani aka Dayaben: अनेकदा सोशल मीडियावर वावड्या उठतात की, लवकरच दिशा वकानी तिचं आयकॉनिक पात्र 'दयाबेन'च्या रुपात पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. मात्र, नुकतंच या मालिकेतील जुन्या अभिनेत्रीने या बातम्यांचा भांडाफोड केला आहे.
advertisement
1/12
'दयाबेन' आता कधीच परतणार नाही! सासरच्यांनी संपवलं दिशा वकानीचं करिअर, समोर ठेवल्या जहरी अटी
मुंबई: भारतीय मनोरंजन विश्वात अनेक मालिका आल्या, ज्यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. मात्र, काही मालिका अशा असतात, ज्या प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यातीलच एक लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'.
advertisement
2/12
गेली १७ वर्षे ही मालिका सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. पण 'दयाबेन' या पात्राला मिळालेल्या प्रसिद्धीची गोष्टच वेगळी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून 'दयाबेन' प्रेक्षकांच्या भेटीला आलेली नाही. त्यामुळे 'दयाबेन' कधी परत येणार, असा प्रश्न चाहत्यांना सतावतोय.
advertisement
3/12
अनेकदा सोशल मीडियावर वावड्या उठतात की, लवकरच दिशा वकानी तिचं आयकॉनिक पात्र 'दयाबेन'च्या रुपात पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. मात्र, नुकतंच या मालिकेतील जुन्या अभिनेत्रीने या बातम्यांचा भांडाफोड केला आहे.
advertisement
4/12
तारक मेहता मालिकेत प्रसिद्ध 'मिसेस रोशन सोढी' हे पात्र साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने मोठा बॉम्ब टाकला असून, दिशा वकानी कधीच परत येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तिने सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.
advertisement
5/12
जेनिफरने 'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या ऐकून चाहते थक्क झाले आहेत. इतकंच नाही, तर तिने दिशाच्या सासरच्यांनी तिच्यावर घातलेल्या अटींबद्दलही माहिती दिली आहे.
advertisement
6/12
जेनिफरने सांगितलं की, दिशा वकानी २०२१ मध्येच पुनरागमन करणार होती. तिने सेटवर येऊन मॉक शूटही केलं होतं, कपड्यांची ट्रायलही घेतली होती. मात्र, ऐनवेळी तिच्या सासरच्या मंडळींनी काही अटी घातल्या, ज्यामुळे सगळं गणित बिघडलं.
advertisement
7/12
दिशाच्या सासरच्यांनी निर्मात्यांकडे घातलेल्या अटी अशा होत्या की दिशा रात्रीच्या वेळी चित्रीकरण करणार नाही, ती ठराविक तासांपेक्षा जास्त वेळ सेटवर थांबणार नाही, रविवारी कोणत्याही परिस्थितीत शूटिंग होणार नाही आणि ती जास्त लांब प्रवासाला तयार नव्हती.
advertisement
8/12
यामुळे असित मोदी यांचा अहंकार दुखावला गेला होता. त्यांनी या अटी मान्य करण्यास नकार दिला. विशेष म्हणजे जेनिफर आणि सोनालिका यांनी असित मोदींना विनंती केली की, दिशाने या शोला खूप काही दिलं आहे. त्यामुळे तुम्ही तिच्या घरी जाऊन काही सीन शूट करा किंवा तिला हव्या तशा सवलती द्या. पण असित मोदींना ते पटलं नाही.
advertisement
9/12
असित मोदींनी जेनिफर आणि सोनालिकाला म्हटलं, 'मी तिच्या घरी का जाऊ? शो माझा आहे, ती माझ्या अटींवर काम करेल.' याच ईगोमुळे दिशाचं कमबॅक होऊ शकलं नाही.
advertisement
10/12
विशेष म्हणजे, 'दयाबेन'च्या रोलसाठी दिल्लीच्या एका मुलीचं ऑडिशनही घेण्यात आलं होतं. जेनिफरने सांगितल्यानुसार, तिचा आवाज आणि देहबोली हुबेहूब दिशासारखी होती. शक्ल न पाहता जर तुम्ही तिला ऐकलं, तर कोणीही सांगू शकलं नसतं की ती दिशा नाही. पण अडचण अशी होती की ती फक्त २७-२८ वर्षांची होती. दिलीप जोशी यांच्यासमोर ती खूपच लहान वाटली असती, म्हणून तिला कास्ट केलं नाही.
advertisement
11/12
सोशल मीडियावर 'दयाबेन' परत येणार असल्याच्या वावड्यांवरही जेनिफर स्पष्टपणे बोलली आहे. तिने सांगितलं की 'दयाबेन' आता कधीही परत येणार नाही. असित मोदी अधूनमधून दिशासोबतचे फोटो शेअर करतात किंवा नवीन दया येणार असल्याच्या बातम्या पसरवतात, ती केवळ एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे.
advertisement
12/12
प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी आणि हाइप क्रिएट करण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू असतो. सोढी, टप्पू, सोनू किंवा अंजली भाभी कोणीही गेलं तरी शोच्या टीआरपीला फरक पडला नाही, हेच निर्मात्यांनी चांगलंच ओळखलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'दयाबेन' आता कधीच परतणार नाही! सासरच्यांनी संपवलं दिशा वकानीचं करिअर, समोर ठेवल्या जहरी अटी, अभिनेत्रीचा मोठा खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल