TRENDING:

April OTT Menu : एप्रिल महिन्याच्या वीकेंडची काळजी मिटली, OTT वर धमाका, सई ताम्हणकरची क्राइम सीरिजही भेटीला

Last Updated:
April OTT Menu : एप्रिल महिना OTT प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाचा खजिना घेऊन येत आहे. प्रत्येक वीकेंडला नवीन सिरीज आणि चित्रपट पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांची चांगलीच मेजवानी होणार आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात OTT प्रेमींसाठी मनोरंजनाची पर्वणीच ठरणार आहे.
advertisement
1/7
एप्रिल महिन्याच्या वीकेंडची काळजी मिटली, OTT वर धमाका, सई ताम्हणकरची क्राइम सीरिजही भेटीला
एप्रिल महिना OTT प्रेक्षकांसाठी जबरदस्त ठरणार आहे. प्रत्येक वीकेंडला काय पाहायचं हा प्रश्न आता मिटणार. विविध वेब सिरीज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कॉमेडी, क्राईम, थ्रिलर आणि ड्रामा अशा सर्व प्रकारच्या कंटेंटचा धमाका या महिन्यात पाहायला मिळणार आहे.
advertisement
2/7
महिन्याची सुरुवात 1 एप्रिलपासून 'हॅप्पी पटेल खतरनाक जासूस' या सिरीजने होणार आहे. वीर दास आणि मोना सिंह यांची मुख्य भूमिका असलेली ही सिरीज नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. कॉमेडी आणि थ्रिल या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.
advertisement
3/7
3 एप्रिलला दोन मोठे प्रोजेक्ट्स रिलीज होणार आहेत. 'मामला लीगल है 2' मध्ये रवि किशन कोर्टरूम ड्रामासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
advertisement
4/7
त्याच दिवशी 'वध 2' ही रिलीज होणार आहे. संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांची दमदार जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. हे दोन्ही प्रोजेक्ट्स नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहेत.
advertisement
5/7
8 एप्रिलला 'द बॉईज' सिझन 5 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्ल अर्बन, जैक क्वैड आणि एंटनी स्टार यांच्या मुख्य भूमिका असलेली ही लोकप्रिय सिरीज अमेझन प्राइमवर रिलीज होणार आहे. अॅक्शन आणि डार्क ह्युमरमुळे या सिरीजची प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ आहे.
advertisement
6/7
15 एप्रिलला 'टोस्टर' हा चित्रपट रिलीज होणार आहे. राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. वेगळ्या कथानकामुळे या चित्रपटाकडे विशेष लक्ष लागलं आहे.
advertisement
7/7
महिन्याच्या शेवटी 17 एप्रिलला 'मटका किंग' ही क्राईम सिरीज रिलीज होणार आहे. विजय वर्मा, सई ताम्हणकर आणि कृतिका कामरा यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही सिरीज अमेझन प्राइमवर येणार आहे. विशेषतः सई ताम्हणकरच्या भूमिकेमुळे या सिरीजबद्दल उत्सुकता वाढली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
April OTT Menu : एप्रिल महिन्याच्या वीकेंडची काळजी मिटली, OTT वर धमाका, सई ताम्हणकरची क्राइम सीरिजही भेटीला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल