TRENDING:

70sची बिनधास्त अभिनेत्री! 16व्या वर्षी शिक्षण सोडलं, एका 'थप्पड' बदललं आयुष्य

Last Updated:
अभिनेत्रीचे आई-वडील सिनेसृष्टीत. तिला 16व्या वर्षीच शाळा सोडावी लागली. पहिल्याच सिनेमावेळी तिला दिग्दर्शकानं कानाखाली मारली.
advertisement
1/8
70sची बिनधास्त अभिनेत्री! 16व्या वर्षी शिक्षण सोडलं, एका 'थप्पड' बदललं आयुष्य
70 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे तनुजा. तिला कुटुंबातूनच अभिनयाचं बाळकडू मिळालं. त्यामुळे तिचं अभिनेत्री होणं काही मोठी गोष्ट नव्हती.
advertisement
2/8
तिची आई शोभना स्वतः एक यशस्वी अभिनेत्री होती आणि तिचे वडील कुमारसेन समर्थ एक निर्माते होते. त्यामुळे तनुजा लहान वयातच बॉलिवूडमध्ये आली. लहान वयातच तिने स्टारडमचा आनंद घेतला.
advertisement
3/8
तनुजा लहान वयातच स्वित्झर्लंडला शिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आलं. तिने इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन भाषा शिकल्या. पण काही कारणास्तव तनुजाला शिक्षण अर्धवट सोडून भारतात परत यावं लागलं.
advertisement
4/8
आई-वडील-बहिण सगळेच अभिनय क्षेत्रात असल्याने आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही असं सगळ्यांना वाटलं होतं. तनुजाला तिला तिची आई शोभना समर्थ यांनी 'छबिली' चित्रपटातून लाँच केले. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सगळे तनुजावर रागावले होते. संपूर्ण टीम तिच्यावर नाराज होती. ती सतत हसत आणि विनोद करत होती.
advertisement
5/8
तनुजाचं हे वागणं बघून दिग्दर्शकाने तिच्या जोरात कानाखाली मारली होती. तिला सीन करायचा होता पण ती सतत हसत होती. त्यामुळेच दिग्दर्शकाने तिच्या कानाखाली लगावली.
advertisement
6/8
तनुजा रडत तिच्या आईकडे गेली आणि केदार शर्माबद्दल तक्रार केली. संपूर्ण घटना ऐकल्यानंतर तिच्या आईनेही तिच्या कानाखाली मारली. त्यानंतर तनुजा चुपचाप सेटवर गेली आणि निमुटपणे शूटींग करू लागली.
advertisement
7/8
तनुजाने अनेक हिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. तिने उत्तम कुमार आणि सौमित्र चॅटर्जी यांच्यासोबत बंगाली चित्रपटांमध्येही स्वतःचे नाव कमावले. तनुजाची मुलगी काजोल ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
advertisement
8/8
तनुजा तिच्या काळातील सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. ती अशा काही अभिनेत्रींपैकी एक होती ज्या सिगारेट ओढत आणि व्हिस्की पित होत्या, पण इतर अभिनेत्रींप्रमाणे तिने ते लपवले नाही. लोक काय विचार करतील याची तिला कधीही पर्वा नव्हती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
70sची बिनधास्त अभिनेत्री! 16व्या वर्षी शिक्षण सोडलं, एका 'थप्पड' बदललं आयुष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल