Kolhapuri Chappal : उद्योग ते ग्राहकापर्यंत 'कोल्हापूरी चप्पल'चा नेमका प्रवास; पण विक्रीची पद्धत ऐकून बसेल धक्का!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Kolhapuri Chappal : कोल्हापुरी चप्पल, 700 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेली एक खास ओळख आहे. या चपला तयार करण्यासाठी कारागीर मोठे कष्ट घेतात, यात महिलांचा सहभागही मोठा आहे. मात्र...
advertisement
1/6

Kolhapuri Chappal : देशातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरी चप्पलला सुमारे 700 वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. एकेकाळी राजे-महाराजे वापरत असलेल्या या मजबूत आणि रुबाबदार चपला आजही पर्यटकांना आकर्षित करतात. कोल्हापूरला येणारा प्रत्येक पर्यटक कोल्हापुरी चप्पल खरेदी केल्याशिवाय जात नाही, कारण ही चप्पल केवळ पायातील पादत्राण नसून, कोल्हापूरची एक खास ओळख आहे.
advertisement
2/6
700 वर्षांची परंपरा : कोल्हापुरी चप्पल हा भारतातील सर्वात जुन्या हस्तकला उद्योगांपैकी एक मानला जातो. दिसायला आकर्षक, वजनाने मजबूत आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या या चपलांचे अनेक प्रकार आहेत, जसे की जारी पंच, चांदणी पंच, तीन माजगी, गांधी, शाहू कापसी आणि पुडा कापशी. ज्या-ज्या गावांमध्ये या चपला तयार केल्या जातात, त्या गावांची नावे त्यांना दिली गेली आहेत. पूर्वी ही चप्पल 2 किलो वजनाची आणि अतिशय मजबूत असायची, जेणेकरून डोंगरदऱ्यांमध्ये चालताना पायांना इजा होऊ नये.
advertisement
3/6
बनवण्याची प्रक्रिया आणि कच्चा माल : पूर्वी बैल, म्हैस आणि शेळीच्या कातडीपासून ही चप्पल तयार केली जायची आणि एक चप्पल बनवायला दीड ते दोन महिने लागायचे. आजकाल कच्चा माल (कातडे) मिरजेतून आणला जातो, जो कोलकाता आणि चेन्नईमधून येतो. मिरजेतून 50-50 किलोचे बंडल घेतल्यास तो स्वस्त पडतो. आणलेले कातडे आधी भिजवून मऊ केले जाते. त्यानंतर चपलांचे विविध भाग तयार केले जातात.
advertisement
4/6
महिला कारागिरांचे मोठे योगदान : कोल्हापुरातील सुभाषनगर भागात कोल्हापुरी चप्पल बनवण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालते. येथील जवळपास प्रत्येक घरात हा व्यवसाय सुरू आहे. या उद्योगात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. चपलांच्या तळपायावरील नाजूक शिलाईचे काम बहुतांश महिला करतात. ही शिलाई हातानेच केली जाते. एका आठवड्यात सुमारे 50 जोड चपलांचे शिलाईकाम पूर्ण होते. एका पुरुष चपलेच्या जोडीसाठी 22 रुपये आणि महिलांच्या चपलेसाठी 20 रुपये मिळतात.
advertisement
5/6
बाजारपेठेतील उलाढाल : कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मंदिराच्या जवळ असलेल्या शिवाजी चौकातील 'चप्पल ओळ' ही कोल्हापुरी चपलांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. शहरातील सुमारे 300-350 दुकानांपैकी बहुतांश दुकाने इथेच आहेत. एका दुकानदाराच्या अंदाजानुसार, येथे दररोज सुमारे 25-30 लाख रुपयांची उलाढाल होते.
advertisement
6/6
ग्राहक आणि किंमत : कोल्हापुरी चपलांची किंमत ग्राहकांच्या दिसण्यावरून ठरवली जाते. दुकानदारांच्या मते, होलसेलमध्ये 500 रुपयांना मिळणारी चप्पल ग्राहकांना 1200 ते 8000 रुपयांपर्यंत विकली जाते. दुचाकीवरून आलेल्या ग्राहकाला ती 1200 रुपयांत, साध्या चारचाकीतून आलेल्याला 2500-300 रुपयांत, तर अलिशान कारमधून आलेल्याला तीच चप्पल 5000-8000 रुपयांपर्यंत विकली जाते. सामान्य ग्राहकांना तर कोल्हापुरी चपलेच्या नावाखाली पुठ्ठ्याच्या चपलाही दिल्या जातात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Kolhapuri Chappal : उद्योग ते ग्राहकापर्यंत 'कोल्हापूरी चप्पल'चा नेमका प्रवास; पण विक्रीची पद्धत ऐकून बसेल धक्का!