Bike : दररोज 10 KM प्रवास करता? मग किती CC ची बाईक घ्यावी, 100cc, 125cc की 150cc काय योग्य?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
मुंबई-पुण्यासारख्या शहरात ट्राफिकमधून वाट काढताना किंवा गल्लीबोळातून गाडी वळवताना आपण अनेकदा विचार करतो की, आपल्याकडे एखादी भारी स्पोर्ट्स बाईक असती तर काय मजा आली असती! पण, केवळ स्टाईल किंवा पावरच्या मागे लागून बाईक खरेदी करणं तुमच्या खिशाला परवडणारं आहे का?
advertisement
1/8

सकाळी ऑफिसला जाताना असो किंवा संध्याकाळी घरची काही कामं उरकायला बाहेर पडायचं असोत, बाईक हा सगळ्यात चांगला पर्याय असतो. लहान गल्ली ती आरामात शिरते, शिवाय शहारातीस ट्रिफिकसाठी हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक घरात एक तरी बाईक असतेच. आपल्यापैकी बहुतेकांचा प्रवास हा 5 ते 10 किलोमीटरच्या आसपास मर्यादित असतो.
advertisement
2/8
मुंबई-पुण्यासारख्या शहरात ट्राफिकमधून वाट काढताना किंवा गल्लीबोळातून गाडी वळवताना आपण अनेकदा विचार करतो की, आपल्याकडे एखादी भारी स्पोर्ट्स बाईक असती तर काय मजा आली असती! पण, केवळ स्टाईल किंवा पावरच्या मागे लागून बाईक खरेदी करणं तुमच्या खिशाला परवडणारं आहे का?
advertisement
3/8
खरे तर, तुमचं रोजचं अंतर किती आहे, यावर तुमची बाईक कोणती असावी हे ठरतं. जर तुमचा रोजचा प्रवास केवळ 10 किलोमीटर (येण्या-जाण्याचे मिळून) असेल, तर चुकीच्या बाईकची निवड करणं हा तोट्याचा व्यवहार ठरू शकतो. अशा कमी अंतरासाठी कोणती बाईक 'व्हॅल्यू फॉर मनी' ठरेल, याचा हा सविस्तर आढावा.
advertisement
4/8
10 किमीचा प्रवास: गरजा आणि वास्तव10 किलोमीटरचा प्रवास हा तांत्रिकदृष्ट्या खूप लहान प्रवास मानला जातो. हा प्रवास प्रामुख्याने शहर किंवा उपनगरातील गर्दीच्या रस्त्यांवरून होतो. अशा वेळी तुम्हाला गाडीच्या 'टॉप स्पीड'पेक्षा गाडीचं 'हँडलिंग' आणि 'मायलेज' जास्त महत्त्वाचं असतं. छोट्या प्रवासात वारंवार क्लच-ब्रेकचा वापर करावा लागतो, त्यामुळे गाडी हलकी आणि इंधनाची बचत करणारी असणे फायद्याचे ठरते.
advertisement
5/8
100cc ते 125cc सेगमेंट: सर्वात स्मार्ट निवडज्यांचा प्रवास दिवसाला केवळ 10 किमी आहे, त्यांच्यासाठी 100cc ते 125cc इंजिन क्षमतेची बाईक म्हणजे 'सोन्यावर पिवळं'मायलेजचा बादशहा या गाड्या प्रति लिटर 60 ते 80 किलोमीटरपर्यंत मायलेज देतात. यामुळे तुमच्या महिन्याचा पेट्रोलचा खर्च निम्म्यावर येतो.कमी देखभाल खर्च (Low Maintenance): या सेगमेंटमधील बाईक्सचे स्पेअर पार्ट्स स्वस्त असतात आणि सर्व्हिसिंगचा खर्चही कमी असतो.या गाड्या वजनाने हलक्या असल्याने ट्रॅफिकमध्ये वळवणं आणि पार्किंग करणं अत्यंत सोपं जातं. जर तुम्हाला थोडी जास्त पावर हवी असेल तर 25cc चा पर्याय उत्तम आहे, जो शहरात धावण्यासाठी पुरेसा आहे.
advertisement
6/8
150cc ते 200cc सेगमेंट कधी निवडावे?जर तुमचं रोजचं ऑफिसचं अंतर 10 किमी असेल, पण तुम्हाला महिन्यातून एक-दोनदा लांबच्या प्रवासाला (उदा. 100-200 किमीची ट्रीप) जायची आवड असेल, तर तुम्ही 150cc ते 200cc चा विचार करू शकता.या गाड्यांमध्ये पिकअप चांगला मिळतो आणि हायवेवर गाडी स्थिर धावते.यांचा मायलेज 40 ते 55 किमीपर्यंत खाली येतो आणि मेंटेनन्सचा खर्च वाढतो. केवळ शहरात 10 किमी फिरण्यासाठी ही गाडी घेणं म्हणजे गरजेपेक्षा जास्त खर्च करण्यासारखं (Overkill) आहे.
advertisement
7/8
हाय CC बाईक्स (२५०cc च्या वर) का टाळाव्यात?दररोजच्या १० किमीच्या प्रवासासाठी २५०cc किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेची बाईक घेणं ही आर्थिकदृष्ट्या मोठी चूक ठरू शकते. १. इंजिनवर ताण: अवघ्या ५ किमीच्या प्रवासात अशा मोठ्या गाड्यांचं इंजिन पूर्णपणे गरम (Warm up) देखील होत नाही, ज्याचा इंजिनच्या आयुष्यावर परिणाम होतो. २. खर्चिक व्यवहार: या गाड्यांचा मायलेज ३०-३५ च्या वर जात नाही आणि त्यांची सर्व्हिसिंग सामान्यांच्या खिशाला परवडणारी नसते.
advertisement
8/8
'फायद्याचा सौदा' नक्की कोणता?थोडक्यात सांगायचं तर, जर तुमचं मुख्य उद्दिष्ट बचत आणि सोय हे असेल, तर १००cc ते १२५cc या रेंजमधील बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. यामुळे तुमची दर किलोमीटरची किंमत कमी राहते आणि ही गुंतवणूक खऱ्या अर्थाने एक 'इकोनॉमिक डील' ठरते. त्यामुळे नवी बाईक घेताना केवळ लूकवर जाऊ नका, तर तुमच्या रोजच्या अंतराचा विचार करूनच योग्य सीसी (CC) निवडा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Bike : दररोज 10 KM प्रवास करता? मग किती CC ची बाईक घ्यावी, 100cc, 125cc की 150cc काय योग्य?