आयुर्वेदातही कारल्याचे औषधी गुण सांगितलेत. आयुर्वेदात कारल्याला करवेलक म्हणतात, ज्यामधे अशुद्ध रक्त, रक्तातली वाढलेली साखर आणि जंतांवरही हे औषध आहे. कारल्यामुळे रक्त शुद्ध होतं आणि शरीराला अ, ब आणि क जीवनसत्त्वं मिळतात. पाहूयात कारलं शरीरासाठी का गुणकारी ठरतं.
Heart Health : हृदयाच्या आरोग्याला प्राधान्य द्या, हृदयाच्या मजबुतीसाठी टिप्स
advertisement
स्वादुपिंडापर्यंत पोहोचून शुद्ध करणारी वनस्पती म्हणजे कारलं. यामुळे रक्ताचं खोलवर पोषण होतं आणि आतड्यांतील जंत दूर करणं, जखमा बऱ्या करणं आणि त्वचेच्या समस्या बऱ्या करण्यासाठी कारलं उपयुक्त आहे. शरीराला अनेक आजारांपासून मुक्त करण्याची शक्ती देखील कारल्यात आहे.
स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी देखील उत्तम - स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी कारलं औषध म्हणून देखील काम करतं, कारण कारल्यामुळे मातांमधे दूध देणारं संप्रेरक तयार करण्यास उत्तेजन मिळतं. पण डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच कारलं खा. कोणत्याही प्रकारची जखम असेल तर कारल्याची पेस्ट औषधासारखी काम करते. जखम बरी करण्यासाठी कारलं उपयुक्त आहे, कारल्यामुळे संसर्ग रोखला जातो आणि सूज कमी होते.
कारलं आतड्यांसाठी देखील खूप महत्वाचं आहे.
Face care : मधानं चेहरा दिसेल सुंदर, फ्रेश, वाचा मधाचे चेहऱ्यासाठी आणखी फायदे
आतडी - आतड्यांचं डिटॉक्सिफिकेशन करणं अत्यंत महत्वाचं आहे. आतडी अनेक दिवस अस्वच्छ राहिली तर आतड्यांमधे जंत आणि हानिकारक जीवाणू वाढू शकतात. त्यामुळे, भूक कमी लागते, जेवणानंतर लगेच शौचालयात जाण्याची इच्छा होते आणि शरीर अन्न पचवू शकत नाही. अशावेळी, कारल्याचा रस पिणं हा चांगला पर्याय आहे. कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी, त्यावर मीठ लावा आणि काही वेळ तसंच राहू द्या. यामुळे पाणी बाहेर पडेल आणि कारल्याचा कडूपणा कमी होईल.
त्वचेसाठी सर्वोत्तम - चेहऱ्यावर भरपूर मुरुम येणं हे रक्तातील अशुद्धतेचं प्रमाण वाढल्याचं लक्षण आहे. दररोज कारल्याचा रस पिणं रक्त शुद्ध करण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे रक्त शुद्ध होतं आणि त्वचेचा पोत सुधारतो. त्वचेला खाज सुटणं आणि त्वचा कोरडी होणं यापासून देखील कारल्यामुळे आराम मिळतो.
