Tejashri Pradhan : मी रेडी आहे..! नेमकं कशाबद्दल बोलतेय तेजश्री प्रधान? नव्या वर्षातील पहिली पोस्ट चर्चेत
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री तेजश्री प्रधानने नव्या वर्षात शेअर केलेली तिची पहिली पोस्ट चर्चेत आली आहे. तेजश्रीने पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे पाहूयात.
advertisement
1/9

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान नेहमीच सकारात्मक असल्याचं पाहायला मिळालं आहे. तेजश्री सोशल मीडियावर सक्रीय असते. तिला 1.4 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात. तेजश्री प्रधानची क्रेझ प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला आहे.
advertisement
2/9
तेजश्रीच्या सोशल मीडिया पोस्टला चाहत्यांची पसंती मिळते. तिच्या पोस्टमधून नेहमीच काही तरी सकारात्मक चाहत्यांपर्यंतच पोहोचवण्याचा प्रयत्न ती करत असते. 2026 या नव्या वर्षात तेजश्रीनं तिचे काही फोटो शेअर केलेत. फोटोंसह पोस्टही लिहिली आहे.
advertisement
3/9
वर्षाच्या पहिल्या दिवशी तेजश्रीनं वीण दोघांतली ही तुटेना मालिकेच्या सेटवर योगाने सुरुवात केली. त्याचे फोटो देखील तिने शेअर केली आहे. त्यानंतर तिनं स्वत:साठी खास पोस्ट लिहिली आहे.
advertisement
4/9
तेजश्रीनं तिचे दोन फोटो पोस्ट केलेत. या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोंमध्ये तिच्या मागे निसर्गाचं मनमोहक दृश्य आणि सूर्य दिसत आहे. तेजश्रीचा चेहरा शांत, आत्मविश्वासपूर्ण आणि आशेने भरलेला दिसतोय.
advertisement
5/9
या फोटोंसोबत तेजश्रीनं लिहिलं आहे, "प्रिय 2026, मी पूर्णपणे तयार आहे. P.S. कृपया दयाळू राहा. #HappyLife" तेजश्रीच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.
advertisement
6/9
तेजश्रीच्या 'मी रेडी आहे' या एका वाक्यातून ती अनेक गोष्टी सांगतेय. आयुष्यात आलेल्या चढ-उतारांनंतर, वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनुभवांनंतर तेजश्री आता नव्या वर्षाला खुल्या मनाने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून सामोरी जाण्यास तयार असल्याचं या पोस्टमधून स्पष्ट होतं.
advertisement
7/9
'मी रेडी आहे' याचा अर्थ फक्त कामापुरताच मर्यादित नाही. तर आयुष्यात येणाऱ्या नवीन संधी, आव्हानं, बदल आणि अनुभव स्वीकारण्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या सज्ज आहोत, असाही घेता येईल.
advertisement
8/9
कामाच्या बाबतीतही तेजश्री प्रधान नेहमीच चर्चेत असते. अभिनय, सशक्त भूमिका आणि ठाम मतांमुळे तिनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशातच नव्या वर्षातील तिची ही पहिली पोस्ट पाहून 2026 मध्ये तेजश्रीकडून काहीतरी खास पाहायला मिळणार अशी अपेक्षा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
advertisement
9/9
तेजश्री सध्या झी मराठीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत काम करतेय. 2026 मध्ये तिची वेब सीरिजही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'आनंद' नावाच्या सिनेमातही ती दिसणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Tejashri Pradhan : मी रेडी आहे..! नेमकं कशाबद्दल बोलतेय तेजश्री प्रधान? नव्या वर्षातील पहिली पोस्ट चर्चेत