Akshaye Khanna Dhurandhar: 'मला कळून चुकलं...', 'धुरंधर' पाहताच अक्षय खन्नाच्या Ex GF ची लांबलचक पोस्ट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Akshaye Khanna Dhurandhar: अक्षयचा हा परफॉर्मन्स इतका प्रभावशाली ठरला की, त्याच्या एक्स गर्लफ्रेंडलाही त्याचे जाहीर कौतुक करण्याची इच्छा झाली!
advertisement
1/11

मुंबई: बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या सर्वत्र 'धुरंधर' चित्रपटातील आपल्या भूमिकेमुळे चर्चेचा विषय बनला आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात त्याने 'रेहमान डकैत' या पाकिस्तानी गुन्हेगार आणि राजकारण्याची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात तो खलनायक असूनही सध्या रणवीर सिंहपेक्षाही त्याची क्रेझ पाहायला मिळतेय.
advertisement
2/11
अक्षयच्या या खलनायकी भूमिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. विशेषतः रॅपर Flipperachi च्या 'FA9LA' या गाण्यावर त्याची ब्लॅक सूटमधील 'स्टाइलिश एंट्री' सोशल मीडियावर 'धुमाकूळ' घालत आहे. त्याचा तो सलाम आणि सहजसुंदर डान्स करण्याची पद्धत चाहत्यांना खूप आवडली आहे.
advertisement
3/11
पण या सगळ्या चर्चेत आता एक खास ट्विस्ट आला आहे. अक्षयचा हा परफॉर्मन्स इतका प्रभावशाली ठरला की, त्याच्या एक्स गर्लफ्रेंडलाही त्याचे जाहीर कौतुक करण्याची इच्छा झाली!
advertisement
4/11
अक्षय खन्नाची ही एक्स गर्लफ्रेंड दुसरी कोणी नसून अभिनेत्री तारा शर्मा आहे. अक्षय आणि तारा २००० च्या दशकात जवळपास दोन वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. ताराने नुकतंच इंस्टाग्रामवर अक्षयचा एक जुना फोटो शेअर करत त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement
5/11
तारा शर्माने लिहिले, "अक्षय, खूप खूप अभिनंदन! आम्ही अजून चित्रपट पाहिलेला नाही, पण आमचं इन्स्टाग्राम फक्त #dhurandar च्या पोस्टने भरून गेलं आहे!"
advertisement
6/11
ती पुढे अक्षयबद्दलची जुनी आठवण सांगताना म्हणाली, "आम्ही दोघे लहानपणापासून एकमेकांना ओळखतो. तू तुझ्या अभिनयाच्या आवडीशी प्रामाणिक राहिला आहेस, हे पाहून खूप छान वाटले. शाळेतील नाटकांमध्येच आम्हाला कळून चुकले होते की तू पुढे हेच करणार आहेस."
advertisement
7/11
ताराने पुढे लिहिले, "मी ओळखत असलेल्या लोकांमधील तू कदाचित सर्वात खासगी आयुष्य जगणारा व्यक्ती आहेस. तुझ्या या शांत मेहनतीला यश मिळत आहे, याचा मला आनंद आहे!"
advertisement
8/11
२००७ मध्ये अक्षय खन्नाने करण जोहरला दिलेल्या एका मुलाखतीत, तारासोबतच्या नात्याला खरे रिलेशनशिप असे म्हटले होते. त्याच वर्षी, एका मुलाखतीत अक्षयला विचारण्यात आले की, "तुझे जवळचे मित्र म्हणतात तारा तुझ्यासाठी योग्य आहे का?" यावर अक्षयने दिलेली प्रतिक्रिया खूप गाजली होती.
advertisement
9/11
तो म्हणाला होता, "हे मित्र कोण आहेत? हो, मी आणि तारा अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. पण ती आता तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करत आहे... लवकरच ती विवाहित स्त्री होणार आहे."
advertisement
10/11
२००७ मध्ये ताराने रूपक सलुजाशी लग्न केले आणि विशेष म्हणजे अक्षय खन्ना तिच्या लग्नात पाहुणा म्हणून हजर होता. ताराने सांगितले होते की, तिच्या नवऱ्यालाही अक्षयबद्दल खूप आदर आहे आणि ब्रेकअपनंतरही त्यांच्यात मैत्री कायम राहिली आहे.
advertisement
11/11
तारा शर्मा एक ब्रिटिश-भारतीय अभिनेत्री, उद्योजिका आणि निर्माती असून 'द तारा शर्मा शो' होस्ट करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Akshaye Khanna Dhurandhar: 'मला कळून चुकलं...', 'धुरंधर' पाहताच अक्षय खन्नाच्या Ex GF ची लांबलचक पोस्ट