TRENDING:

22 वर्ष मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात होती Tiger 3 फेम 'ही' अभिनेत्री; एकेकाळी तुफान रंगल्या होत्या अफेअरच्या चर्चा

Last Updated:
सध्या मनोरंजनसृष्टीत एकाच चित्रपटाची चर्चा आहे तो म्हणजे सलमान खानचा टायगर ३. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुंवाधार कमाई करत आहे. याच चित्रपटात सलमान खान आणि कतरीना कैफसोबत साऊथची एकेकाळची सुपरस्टार अभिनेत्री सिमरन बग्गाही महत्वाच्या भूमिकेत दिसत आहे, तिने या चित्रपटात पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांची भूमिका साकारली आहे. पण ही सिमरन बग्गा नक्की आहे तरी कोण जाणून घ्या.
advertisement
1/8
22 वर्ष मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात होती टायगर 3 फेम 'ही' अभिनेत्री
टायगर 3 या चित्रपटात सलमान खान आणि कतरीना कैफसोबत साऊथची एकेकाळची सुपरस्टार अभिनेत्री सिमरन बग्गाही महत्वाच्या भूमिकेत दिसत आहे, तिने या चित्रपटात पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांची भूमिका साकारली आहे.
advertisement
2/8
सिमरन बग्गा ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्री आहे. तिचे खरे नाव ऋषिबाला नवल असं आहे.
advertisement
3/8
सिमरनने हिंदी आणि साऊथ चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनेत्री असण्यासोबतच सिमनर डान्सर, सिंगर आणि प्रोड्युसर देखील आहे. तिने अनेक पुरस्कार आपल्या नावे केले आहेत.
advertisement
4/8
सिमरनने 2 डिसेंबर 2003 रोजी तिचा बालपणीचा मित्र दीपक बग्गा याच्याशी लग्न केले. दोघांनाही दोन मुलं असून ते सुखी संसार करत आहेत.
advertisement
5/8
पण सिमरनच नाव एके काळी साऊथच्या मोठी स्टारसोबत जोडलं गेलं होतं. हे अभिनेते होते कमल हसन.
advertisement
6/8
2000 साली सिमरन तिच्या प्रोफेशनल लाइफमुळे नाही तर पर्सनल लाईफमुळे प्रसिद्धीझोतात आली. सिमरन तिच्यापेक्षा 22 वर्षांनी मोठे असलेल्या साऊथ सुपरस्टार कमल हासनच्या प्रेमात पडल्याच्या अनेक अफवा पसरल्या होत्या. या गॉसिप्सला सुरुवात झाली जेव्हा दोघांनी पंचतंथिरम या चित्रपटात एकत्र काम केले होते.
advertisement
7/8
कमल हसन आणि सिमरन हे सहकलाकार होते. पण सिमरन आणि कमल हसन यांच्यातील संबंध सहकाऱ्यांपेक्षा जास्त असल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. शूटिंग संपल्यानंतरही दोघे एकमेकांसोबत एकत्र वेळ घालवायचे. सिमरन कमल हसन यांच्यापेक्षा तब्बल 22 वर्षांनी लहान होती.
advertisement
8/8
पण चित्रपट प्रदर्शित होताच दोघांच्या नात्यात दुरावा आला. या चित्रपटानंतर त्यांचे नातेही संपुष्टात आल्याचं बोललं गेलं. कमल हसनच्या लव्ह लाईफचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा सिमरनच्या नावाचाही उल्लेख होतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
22 वर्ष मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात होती Tiger 3 फेम 'ही' अभिनेत्री; एकेकाळी तुफान रंगल्या होत्या अफेअरच्या चर्चा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल