TRENDING:

Trending Movies : थ्रिलर ते रोमान्स, प्राईम व्हिडीओवरील TOP 5 ट्रेडिंग मूव्ही, तुमच्या वॉच लिस्टमध्ये असायलाच हव्यात

Last Updated:
Trending Movies on Prime Video : अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर थ्रिलर ते कॉमेडीपर्यंत अनेक चित्रपट ट्रेंड करत आहेत. जाणून घ्या प्राईम व्हिडीओवर ट्रेंड करत असलेल्या TOP 5 चित्रपटांबद्दल
advertisement
1/7
प्राईम व्हिडीओवरील TOP 5 ट्रेडिंग मूव्ही, तुमच्या वॉच लिस्टमध्ये असायलाच हव्यात
ओटीटीवर प्राईम व्हिडीओवरील वेबसीरिज आणि फिल्म पाहायला प्रेक्षकांना आवडतं. हल्की-फुल्की कथा ते क्राइम-थ्रिलरपर्यंत सर्वकाही या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. आज जाणून घ्या प्राईम व्हिडीओवरील TOP 5 ट्रेंडिंग मूव्हीबद्दल. या फिल्म आणि सीरिज प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करतील.
advertisement
2/7
निशानची (Nishaanchi) : 'निशानची' ही एक जबरदस्त अॅक्शन-थ्रिलर फिल्म आहे. एका शूटरभोवती या चित्रपटाचं कथानक फिरतं. निशानेबाजीसाठी हा शूटर फेमस असतो. गुन्हेगार आणि भ्रष्ट लोकांच्या विरोधात लढताना तो दिसतो आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो.
advertisement
3/7
कांतारा : चॅप्टर 1 (Kantara Chapter 1) : 'कांतारा: चॅप्टर 1'मध्ये जंगल, परंपरा, देवपूजा आणि स्थानिक संस्कृती यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. कथा अशा एका योद्ध्याची आहे जो देवशक्ती आणि निसर्गाशी जोडलेला आहे आणि आपल्या भूमीचे, आपल्या लोकांचे रक्षण करण्यासाठी लढतो.
advertisement
4/7
प्लेडेट :'प्लेडेट' हा एक मानसशास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे. मुलांची एक भेट रहस्यमय वळण घेताना या चित्रपटात पाहायला मिळेल. सुरुवातीला कथा साधारण वाटते, पण हळूहळू गोष्टी गुंतागुंतीच्या होऊ लागतात आणि वातावरण तणावपूर्ण बनते. मुलांची मैत्री, पालकांची भीती आणि रहस्यांचे उलगडणे हे चित्रपटाला अत्यंत रोमांचक बनवतं.
advertisement
5/7
परम सुंदरी (Param Sundari) : 'परम सुंदरी' हा एक हलकाफुलका ड्रामा असणारा चित्रपट आहे. ज्यात एक मुलगी स्वतःची ओळख आणि स्वप्नांसाठी संघर्ष करते. ही कथा नातेसंबंध, समाजाची विचारसरणी आणि स्वतःच्या इच्छा यांच्या दरम्यान अडकलेल्या आयुष्याचे चित्रण करते.
advertisement
6/7
मित्रा मंडली : 'मित्रा मंडळी' ही मित्रांच्या एक प्रेमळ मैत्रीची कथा आहे, जे आयुष्याच्या टेन्शनमध्ये, नात्यांच्या गुंतागुंतीत आणि करिअरच्या स्पर्धेतही एकमेकांची साथ सोडत नाहीत. प्रत्येक पात्राची स्वतःची एक गोष्ट आहे आणि सर्व मिळून एक सुंदर मैत्रीचे नाते तयार करतात.
advertisement
7/7
प्राईम व्हिडीओवरील निशानची, कांतारा:चॅप्टर 1, प्लेटेड, परम सुंदरी, मित्रा मंडली ही टॉप 5 ट्रेडिंग मूव्ही तुमच्या वॉच लिस्टमध्ये असायलाच हवेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Trending Movies : थ्रिलर ते रोमान्स, प्राईम व्हिडीओवरील TOP 5 ट्रेडिंग मूव्ही, तुमच्या वॉच लिस्टमध्ये असायलाच हव्यात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल