TRENDING:

कोण आहे मॅरी डी' कोस्टा? जिने फोडलं पलाश मुच्छलचं भांडं, आलं स्मृतीच्या आयुष्यात वादळ

Last Updated:
Who is Mary D'Costa : स्मृती आणि पलाश मुच्छल यांचं लग्न पोस्टपोन झालं आणि काही तासात सोशल मीडियावर एका चॅट्सचा स्क्रिनशॉट व्हायरल झाला. हे चॅट्स पलाश मुच्छल आणि एका कोरिओग्राफरचे होते. या चॅट्सनंतर स्मृती-पलाशच्या नात्यात काहीतरी मेजर बिनसल्याचं समोर आलं. पण पलाशचे हे चॅट्स लीक करणारी ती कोरिओग्राफर आहे तरी कोण?
advertisement
1/8
कोण आहे मॅरी डी' कोस्टा? जिने फोडलं पलाशचं भांडं, आलं स्मृतीच्या आयुष्यात वादळ
क्रिकेटर स्मृती मानधना आणि  संगीतकार पलाश मुच्छल यांचं 23 नोव्हेंबर रोजी लग्न होणार होतं. मात्र स्मृतीच्या वडिलांची तब्येक बिघडल्याने त्यांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं. दरम्यान या पुढे ढकललेल्या लग्नावरून चांगलाच गदारोळ सोशल मीडियावर पाहायला मिळाला. स्मृतीनं दोघांचे लग्नाचे फोटो- व्हिडीओ डिलीट केले आणि त्यानंतर पलाशचे प्रायव्हेट चॅट्स एका मॉडेलकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले.
advertisement
2/8
हे चॅट्स समोर आल्यानंतर या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं. पलाश मुच्छलने भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधनाची फसवणूक केली होती का? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर चर्चेला आले आहेत.  चाहते पलाश आणि स्मृतीकडून सत्य जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान पलाशचे चॅट्स व्हायरल करणारी ती कोरिओग्राफर नक्की कोण होती असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
advertisement
3/8
मेरी डि'कोस्टाच्या स्क्रीनशॉट्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. मेरी डि'कोस्टा कोण आहे? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. वृत्तांनुसार, मेरी डि'कोस्टा एक कोरिओग्राफर आहे. स्मृती आणि पलाशच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांसाठी सगळ्या डान्सची कोरिओग्राफी केली होती.
advertisement
4/8
मेरी डि'कोस्टानं तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट आता प्रायव्हेट केलं आहे. पण व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉट्समध्ये पलाशचे नाव आणि आयडी पाहायला मिळत आहे.  हे चॅट्स मे 2025 चे असल्याचे सांगितले जातं आहे.  जिथे पलाशने मेरीला पोहण्यासाठी, स्पा टाइमसाठी आणि वर्सोवा बीचवर सकाळी ट्रिपसाठी इनवाइट केलं होतं.
advertisement
5/8
जेव्हा मेरीने त्यांच्या रिलेशनची स्थिती विचारली तेव्हा पलाश म्हणाला, "आम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनमध्ये आहोत. आमचं नातं जवळपास डेड आहे." एका चॅटमध्ये, त्याने मेरीला 'बेबी' असेही म्हटलं आहे. संपूर्ण चॅट्समध्ये तो तिला भेटण्यासाठी प्लानिंग करताना दिसतोय.
advertisement
6/8
रेडिट थ्रेड्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, स्मृतीच्या वडिलांनी लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांमध्ये पलाशला एका महिलेच्या जवळ पाहिले होते, ज्यामुळे भांडण आणि हृदयविकाराचा झटका आला. तर काही युझर्सनी असंही म्हटलं आहे की, लग्नाच्या चार दिवस आधी डान्स प्रॅक्टिस आधी पलाशला एका महिलेसोबत किस करताना पाहिलं गेलं होतं.
advertisement
7/8
या वृत्तांनंतर, स्मृतीने इंस्टाग्रामवरून लग्नाआधीचे सगळे फोटो डिलीट केले असावे असा दावा करण्यात येत आहे. स्मृतीची अत्यंत जवळची मैत्रीण शिवाली शिंदे आणि टीममेट श्रेयंका पाटील यांनीही पलाशला सोशल मीडियावरून अनफॉलो केलं आहे.  पलाशची बहीण पलक माचलने लग्न पुढे ढकलल्याची माहिती दिली. त्याचबरोबर तिने त्यांच्या प्रायव्हसीचा आदर ठेवा अशी विनंतीही केली होती.
advertisement
8/8
सध्या, स्मृती, पलाश किंवा मेरी या दोघांनीही या प्रकरणी कोणतेही विधान केलेले नाही. दरम्यान स्मृतीच्या वडीलांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. चाहते आता स्मृती आणि पलाश यांच्या निवेदनाची वाट पाहत आहेत. त्यांच्या लग्नासंबंधी सुरू असलेल्या सगळ्या चर्चा खऱ्या की खोट्या? त्यांचं लग्न होणार की नाही? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कोण आहे मॅरी डी' कोस्टा? जिने फोडलं पलाश मुच्छलचं भांडं, आलं स्मृतीच्या आयुष्यात वादळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल